आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

महामुकाबला; २०२२ मध्ये होणाऱ्या ३ विश्वचषकात भारत-पाकिस्तान ४ वेळा आमने-सामने येणार


क्रिकेट चाहत्यांसाठी २०२२ मध्ये भरगच्च मेजवानी आहे. या वर्षात एकूण ३ विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. मागील वर्षाची अपयशाची परतफेड करण्याची संधी भारतीय संघाला या स्पर्धेत आहे. मागील वर्षी झालेल्या दोन आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाला विजेतेपदानं हुलकावणी दिली होती. त्याचबरोबर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील महामुकाबल्याचा थरार या वर्षात किमान ४ वेळा अनुभवता येणार आहे.

जानेवारीमध्ये सर्वात प्रथम वेस्ट-इंडीज मध्ये अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धा १४ तारखेपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होतील. सर्व संघांची विभागणी ४ गटांमध्ये करण्यात आली आहे. भारतीय संघाचा ब गटात समावेश आहे. या ग्रुपमध्ये आयर्लंड, युंगाडा आणि दक्षिण आफ्रिका हे अन्य संघ आहेत. प्रत्येक संघामधील अव्वल २ संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. या स्पर्धेत पाकिस्तानचा समावेश  क गटामध्ये अफगाणिस्तान, पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वेसह करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान करो या मरो लढतील एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे.

new google

महिलांचा एकदिवसीय विश्वचषक (2022 Women’s World Cup) देखील यावर्षी होत आहे. करोनामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. न्यूझीलंडमध्ये ४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान हा विश्वचषक होईल. यामध्ये ८ संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघांना एकमेकांच्या विरुद्ध एक लढत खेळायची आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पात्रता फेरीमध्ये एक लढत होणार आहे. त्याचबरोबर दोन्ही संघ नॉक आऊट फेरीमध्ये गेल्या तर तिथंही त्यांच्यात सामना होऊ शकतो.

टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धा यावर्षी ऑस्ट्रेलियात होणार आहे. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार असून ४५ सामने होतील. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम यामध्ये खेळणार आहेत. या विश्वचषकाच वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही. पण, लीग किंवा नॉक आऊट फेरीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळू शकतात. २०२१ साली झालेल्या टी20 विश्वचषकात झालेल्या दोन्ही देशांच्या लढतीत पाकिस्ताननं विजय मिळवला होता. त्याचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाला आहे.====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here