आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

रोहित शर्मा दुखापतग्रस्त तर या खेळाडूची कर्णधारपदी लागली वर्णी!


दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाचे कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेचे नियोजन करण्यात आले आहे. एकदिवसीय मालिकांसाठी नव्याने निवड झालेला कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याने संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या फिटनेस टेस्ट ची बराच वेळ वाट बघितल्यानंतर अखेर निवड समितीने संघाची घोषणा केली.

फिटनेस टेस्ट मध्ये पात्रता सिद्ध न करता आल्याने रोहित शर्माला या मालिकेतून वगळण्यात आले असून त्याच्याऐवजी के एल राहुल ला संघाच्या नेतृत्व पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपद सांभाळेल असे जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही खेळाडू प्रथमच संपूर्ण मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. मुख्य म्हणजे या मालिकेत विराट कोहली केवळ फलंदाज म्हणून खेळणार आहे.

new google

भारताचे मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की आगामी महत्त्वाच्या मालिका आणि टी-२० विश्वचषक लक्षात घेता रोहित शर्माला न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. टीमची घोषणा केल्यानंतर चेतन शर्मा म्हणाले की “आजकाल बरंच क्रिकेट खेळल जात. कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त होऊ इच्छित नाही. प्रत्येकाला खेळायचं आहे. आणि यामुळेच रोहितने या मालिकेत खेळण्यापासून माघार घेतली आहे.”

वनडेसाठी भारतीय संघ:

केएल राहुल (कर्णधार,), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यझुवेंद्र चहल, आर.अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here