आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली नव्या वर्षात पुन्हा एकदा वादात सापडला आहे.


कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली नव्या वर्षात पुन्हा एकदा वादात सापडला आहे. विराटला काही दिवसांपूर्वी एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराटला टी-20 संघाचे कर्णधार सोडू नये, अशी सूचना केल्याचा दावा केला होता.

विराटनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गांगुलीचा दावा फेटाळला होता.  त्यानंतर आता निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी गांगुलीच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे विराट कोहलीनं सांगितलं ते कितपत खरं आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

new google

चेतन शर्मांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘विराट कोहलीनं टी20 विश्वचषकापूर्वी आम्हाला या प्रकारातील कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितले. आम्ही त्याचवेळी त्याला या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली होती. त्यावेळी भारतीय संघ मोठी स्पर्धा खेळणार होती. आम्ही तेव्हा मर्यांतील षटकांच्या प्रकारातील कर्णधार एकच असेल हे सांगू शकत नव्हतो.’ विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्याचा निर्णय हा संपूर्णपणे निवड समितीचा होता, असेही शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले.

चेतन शर्मा यांनी पुढे सांगितले की, ‘विराट आणि आमची चांगली चर्चा झाली. त्यावेळी फक्त कसोटी संघाची  निवड होणार होती. मी स्वत: त्याला संपर्क केला होता. आम्ही त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरुन हटवण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. या प्रकारचा वाद योग्य नाही. विराट कोहली टीमच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. नव्या वर्षात हा वाद समाप्त झाला पाहिजे.’

रोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. त्यांच्यातील मतभेदाच्या गोष्टी या हास्यास्पद आहेत. आमचे काम हे चांगली संघ निवडणे हे आहे. आम्हाला कोणत्याही वादामध्ये पडण्याची इच्छा नाही.’ असे शर्मा यांनी यावेळी सांगितले.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here