आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फेसबुकपेज  फॉलो करा

आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

महिला भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट टी20 खेळाडूंच्या शर्यतीत


T20 Player Of the Year: स्मृती मंधाना सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या रेसमध्ये, ‘या’ खेळाडूंशी टक्कर

महिला भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मंधाना या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट टी20 खेळाडूंच्या शर्यतीमध्ये आहे. आयसीसीनं (ICC) या वर्षीच्या पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर केले आहेत. यामध्ये स्मृतीची टक्कर इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंट आणि नेट साइवर तसेच आयर्लंडच्या गॅबी लुईस यांच्याशी आहे. स्मृतीनं २०२१ मधील ९ टी२० मॅचमध्ये ३२ च्या सरासरीनं २५५ रन काढले आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. जानेवारी महिन्यात हे पुरस्कार जाहीर करण्यात येतील.

new google

भारताच्या कोणत्याही पुरुष खेळाडूला एकदिवसीय किंवा टी-20 प्रकारातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामंकन मिळालेलं नाही. आयसीसीनं एकदिवसीय मधील पुरस्कारासाठी ४ पुरूष खेळाडूंची नामांकनं जाहीर केली आहेत. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, बांगलादेशचा शाकिब अल हसन, दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारासाठी आर. अश्विनला नामांकन मिळालं आहे. अश्विननं यावर्षभरात ५४ बळी घेतल्या आहेत.

स्मृतीनं यावर्षी टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध अर्धशतक झळकावले आहे. तर आयपर्लंडच्या गॅबी लुईसनं १० टी20 सामन्यामध्ये मध्ये ४१ च्या सरासरीनं ३२५ धावा काढल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. ती आयर्लंडकडून शतक झळकावणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे. लुईसच्या बॅटींगमुळे आयर्लंडनं २ मालिका मध्ये विजय मिळवला आहे.

इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंट आणि नेट साइवर यांनाही ४ खेळाडूंच्या यादीत जागा मिळाली आहे. ब्यूमोंटनं ९ सामन्यामध्ये ३४ च्या सरासरीनं ३०३ धावा काढल्या आहेत. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर साइवरनं ९ सामन्या मध्ये १९ च्या सरासरीनं १५३ धावा काढल्या आहेत. तसंच २० च्या सरासरीनं १० बळीही मिळवल्या आहेत.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here