आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

ख्रिस केन्स: जीवघेण्या आजारावर मात करणारा न्यूझीलंडचा खरा योद्धा!


क्रिकेटमध्ये जे काही थरारक आणि संघर्षमय किंवा एखादा सामना श्वास रोखून धरावा इतका पराकोटीला जातो त्यावेळी जो खेळाडू मैदानावर असतो त्याची झुंज, संघर्ष हा एखाद्या योध्यापेक्षा वेगळा नसतो.मग हा सामना जिंकल्यावर किंवा ती खेळी यशस्वी झाल्यावर या खेळाडूचे आपण कौतुक करीत असतो.

असे अनेक प्रसंग क्रिकेटच्या मैदानावरच नेहमी घडत असतात. आज मात्र एका धाडसी क्रिकेट खेळाडूची मैदानाबाहेरील संघर्षाची कहाणी आपण बघूया..! या खेळाडूने मैदानावर तर एकेकाळी आपल्या देशासाठी व क्रिकेट जगतासाठी उत्तम कामगिरी केलीच आहे मात्र आता त्याची झुंज चक्क मृत्यूशी होती. या क्रिकेट खेळाडूचे नाव आहे क्रिस केन्स.

न्यूझीलंड संघाचा हा लोकप्रिय खेळाडु सध्या 51 वर्षांचा आहे. 4 महिन्यापूर्वी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला.यामुळे त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले, तो जगेल की नाही याची खात्री नव्हती, परिस्थिती खूप गंभीर होती.या गुंतागुंतीच्या स्थितीत त्याला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले.

new google

ख्रिस केन्स

मैदानावर शर्थीची खेळी करणाऱ्या ख्रिसने हा जीवनासोबतचा संघर्ष देखील जोमाने लढला. या दरम्यान त्याच्यावर 4 ओपन हार्ट सर्जरी कराव्या लागल्या.तो बरा होईल असे वाटत असतानाच त्याच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या, त्यानंतर ऑपरेशन नंतर स्पायनल स्ट्रोकमुळे ख्रिसच्या कमरेखालचा भाग निकामी झाला. त्यामुळे हा खेळाडू पुन्हा मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन पोहचला.मात्र खऱ्या योद्धया प्रमाणे ख्रिसची झुंज सुरू होती.

या सर्व वेदना आणि त्रासावर मात करून नुकताच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला ज्यात ख्रिस आपल्या लहान मुलांसमवेत व्हीलचेअर वर बसून अंगणात क्रिकेट खेळताना दिसत आहे. तलावात डुबकी मारून पोहण्याचा त्याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. त्याच्या या मैदानाबाहेरील कडव्या झुंजीचे नेटकरी कौतुक करीत आहेत.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here