आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

निवृत्तीनंतर काही दिवसांतच हरभजन सिंहने धोनी आणि बीसीसीआयवर हे गंभीर आरोप लावलेत..


सध्याच्या घडीला भारतीय संघातील अंतर्गत वाद वाढतच चालले आहे. सुरवातीला कर्णधार पदावरून झालेले आरोप प्रत्यारोप असो की मग माजी  प्रशिक्षक रवी शास्त्रीयांच्यावर आश्वीनने केलेले आरोप असो. गेल्या काही महिन्यामध्ये अनेक खेळाडू आपल्यावर झालेल्या अन्यायाचा खुलासा करतांना दिसताहेत. अश्यातच आताच निवृत्त झालेला भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंहने मोठा खुलासा करत धोनी आणि बीसीसीआयवर आरोप लावलेत.

क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसांनी भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने खुलासा केला आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि माजी कर्णधार एमएस धोनीने त्याला राष्ट्रीय संघातून वगळले आहे. हरभजन हा दीर्घकाळ भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज होता आणि अखेरीस त्याने त्याच्या शानदार कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतली.

41 वर्षीय माजी खेळाडूने गेल्या डिसेंबरमध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता दिग्गज फिरकीपटूने बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांबद्दल खुलासा केला आहे.

new google

हरभजन सिंह

हरभजनने झी न्यूजला सांगितले की, नशिबाने नेहमीच मला साथ दिली आहे. फक्त काही बाह्य घटक माझ्या बाजूने नव्हते आणि कदाचित ते पूर्णपणे माझ्या विरोधात होते. मी ज्या पद्धतीने गोलंदाजी करत होतो किंवा ज्या गतीने मी प्रगती करत होतो ते पाहून बहुधा काही लोकांना ते आवडलेलं नसावे. मी 400 विकेट घेतल्या आणि जर मी आणखी 4-5 वर्षे खेळलो असतो, तर कदाचित मी 100-150 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या असत्या. परंतु अंतर्गत वादामुळेच मला संघातून बाहेर केल गेलं.

यावर पुढे बोलतांना हरभजन म्हणाला की, तेव्हा एमएस धोनी कर्णधार होता पण मला वाटते की या गोष्टीमुळे धोनी आपली मनमानी चालवायचा.  काही प्रमाणात बीसीसीआयचे काही अधिकारीही त्यात सहभागी होते आणि त्यांना मला कर्णधाराकडून पाठिंबा मिळावा अशी त्यांची इच्छा नव्हती. पण कर्णधार कधीही बीसीसीआयच्या वर असू शकत नाही. बीसीसीआयचे अधिकारी नेहमीच कर्णधार, प्रशिक्षक किंवा संघापेक्षा वरचे असतात.

हरभजन म्हणाला, इतर खेळाडूंच्या तुलनेत धोनीला बीसीसीआयचा जास्त पाठिंबा होता आणि इतर खेळाडूंनाही असाच पाठिंबा मिळाला असता तर ते खेळले असते. बाकीचे खेळाडू विसरले किंवा चांगली कामगिरी केली नाही असे नाही.

प्रत्येक खेळाडूला भारताची जर्सी घालून निवृत्ती घ्यायची असते पण नशीब नेहमीच तुमच्या सोबत नसते आणि कधी कधी तुम्हाला जे हवे असते ते तुम्हाला हवे नसते. तुम्ही VVS (लक्ष्मण), राहुल (द्रविड) आणि वीरेंद्र सेहवाग सारखे खेळाडू पाहिले असतील.

हरभजननेही त्याच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त केली. हरभजन म्हणाला, मला माझ्या आयुष्यावर चित्रपट किंवा वेब सिरीज बनवायची आहे जेणेकरून लोकांना माझी कथा, मी कसा माणूस आहे आणि मी काय करतो हे कळू शकेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here