आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

‘नो बॉल’ वर हनुमा विहिरीला दिले आउट? व्हिडिओ पाहून अंपायरवर भडकले चाहते..


जोहान्सबर्ग येथे खेळल्या जात असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या जागी हनुमा विहारीला संधी देण्यात आली होती मात्र त्याला या संधीचा फायदा उठवता आला नाही. विहारीने बाद होण्यापूर्वी 53 चेंडूत 20 धावा केल्या. मात्र, तो ज्या चेंडूवर बाद  झाला, त्याबद्दल सोशल मीडियावर गदारोळ होताना दिसत आहे.

हनुमा विहारी

39व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रबाडाने विहारीला व्हॅन डर डुसेनकरवी झेलबाद केले. डुसेनने अप्रतिम झेल घेतला, ते पाहून विहारीही भडकला. यादरम्यान विहारी शांतपणे पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला पण टीव्ही रिप्ले पाहिल्यावर रबाडाचा पाय बॉलिंग क्रिझच्या रेषेला स्पर्श करत असल्याचे दिसून आले.

त्यामुळेच चाहते विहारीला अशुभ म्हणत आहेत कारण तो ज्या चेंडूवर बाद झाला तो नो बॉल होता पण मैदानावरील पंच किंवा तिसऱ्या पंचालाही नो बॉल दिसला नाही. सोशल मीडियावर अंपायरला जोरदार ट्रोल केलं जातंय.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर विराटच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवणाऱ्या केएल राहुलने शानदार अर्धशतकी खेळी खेळली पण त्याच्याशिवाय दुसरा कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही आणि त्यामुळेच भारताला १५० धावांच्या आधीच ५ गडी  गमवावे लागले.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here