आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राईब करा.

===

‘साल बदललं पण राहणे नाही’ दुसऱ्या कसोटीही स्वस्तात बाद झाल्याने राहणे होतोय ट्रोल..


दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. ज्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातही भारताचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरलाय. अजिंक्य रहाणेने स्कोअररलाही जुमानले नाही आणि पहिल्याच चेंडूवर गोल्डन डक मारून बाद झाला. रहाणेच्या या खराब कामगिरीमुळे त्याला तिसऱ्या कसोटीतून वगळण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

अजिंक्य रहाणे

पुजारा बाद झाल्यानंतर रहाणे क्रीझवर आला आणि विराटच्या अनुपस्थितीत चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या आशा होत्या, पण त्याने अवघ्या एका चेंडूवर त्या आशा धुळीस मिळवल्या. या मालिकेतील पहिला सामना खेळत असलेल्या डुआन ऑलिव्हियरने रहाणेला आपला शिकार बनवले.

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संतापाचा भडका उडत असून एका चाहत्याने तर आता निवृत्ती घ्यावी असे म्हटले आहे तर एका चाहत्याने रहाणेनव्हे तर वर्ष बदलल्याचे लिहिले आहे.  भारतान  सध्या १४६ धावांवर ५ गडी गमावले आहेत.


====

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here