आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

चालू सामन्यात आश्विन शार्दुल ठाकूरला ‘म्हणाला कोण आहेस तू?’, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल..


IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद असलेल्या या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे. जिथे भारतीय संघाने दुसऱ्या डावात २६६ धावा केल्या आणि आफ्रिकन संघासमोर २४० धावांचे लक्ष्य ठेवले. त्याआधी  दुसऱ्या दिवशी शार्दुल ठाकूरने संस्मरणीय गोलंदाजी केली.

वांडरर्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 202 धावांत आटोपला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठ्या आघाडीची अपेक्षा होती. मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरने जबरदस्त गोलंदाजी केली. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव फार मोठा होऊ शकला नाही आणि संपूर्ण संघ केवळ 229 धावांत गारद झाला.

शार्दुल ठाकूरने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना 7 बळी घेतले आणि दक्षिण आफ्रिकेला केवळ 27 धावांची आघाडी घेता आली. 61 धावांच्या मोबदल्यात दक्षिण आफ्रिकेच्या 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणाऱ्या शार्दुलबद्दल भारतीय संघातील खेळाडूंनाही आश्चर्य वाटत आहे. भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन शार्दुलच्या या गोलंदाजीवर खूप खूश झाल्यामुळे आश्चर्यचकित झाला आहे,आणि आश्विन त्याच्या स्तुतीत जे काही बोलला ते स्टंप माईक मध्ये रेकॉर्ड झाले.

आश्विन

अश्विन शार्दुलला म्हणाला, तू कोण आहेस यार? कुठून आलास आला आई विकेट घेतो. आश्विनचा हा आवाज रेकॉर्ड झाला आणि हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे लोकांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here