आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पुष्पा आवडलाय? तर अल्लू अर्जुनचे हे 5 चित्रपटही तुम्ही पहायलाच पाहिजेत….


सुपरस्टार अल्लु अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट सध्या भारतात चांगलाच कमाई करतोय. पुष्पाने २०२१मध्ये सर्वांधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आपलं कमावलंय. पुष्पाने जरी अल्लू अर्जुनच्या स्टारडम ला चार चांद लावले असले तरीही अल्लूच्या इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

अल्लू अर्जुन हे आज दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे, हे नाव केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारतात आणि परदेशातही खूप लोकप्रिय आहे. अल्लू अर्जुन हा साऊथ इंडस्ट्रीतील अशा लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे ज्याने आपल्या शैली आणि अभिनयाच्या जोरावर एक वेगळी प्रतिमा आणि उच्च स्थान प्राप्त केले आहे. 2003 साली प्रदर्शित झालेला तेलुगू चित्रपट ‘गंगोत्री’ हा त्याचा पहिला चित्रपट होता आणि त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

आज या लेखात आपण त्याच्या चित्रपट कारकिर्दीतील सर्वात मोठ्या 5 ब्लॉकबस्टर चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी खऱ्या अर्थाने अल्लू अर्जुनला स्टार बनवले..

चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते 5 चित्रपट 

अल्लू अर्जुन

 

अला वैकुंठपुरमलो: ‘अला वैकुंठपुरमलो’ हा एक अॅक्शन ड्रामा तेलगू चित्रपट आहे जो 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री पूजा हेगडे आणि तब्बू मुख्य भूमिकेत होत्या. हा चित्रपट हिंदी भाषेत डब झाला नसला तरी, ‘अला वैकुंठपुरमलो’ या चित्रपटाचे जगभरात २६० कोटींचे कलेक्शन झाले होते आणि हा चित्रपट २०२० मधील सर्वाधिक कमाई करणारा ब्लॉकबस्टर दक्षिण भारतीय चित्रपट होता.

 सरैनोडू: अल्लू अर्जुनच्या चित्रपट कारकिर्दीतील दुसरा सर्वोच्च बॉक्स ऑफिस कलेक्शन ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सरैनोडू’ हा 2016 मध्ये प्रदर्शित झालेला तेलुगू अॅक्शन चित्रपट आहे ज्याची निर्मिती त्याचे वडील अल्लू अरबिंदो यांनी केली होती. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि कॅथरीन तेरेसा मुख्य भूमिकेत होत्या.

इतकेच नाही तर हा चित्रपट यूट्यूबवर हिंदीत डब केलेला सर्वाधिक पाहिला जाणारा दक्षिण भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटाच्या बॉक्स कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 127 कोटी रुपयांच्या जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनसह ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

DJ- Duvvada Jagannadham : 2017 मध्ये प्रदर्शित झालेला तेलुगू अॅक्शन कॉमेडी चित्रपट ‘DJ’ अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. प्रसिद्ध दक्षिण भारतीय निर्माते दिल राजू यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुनसह पूजा हेगडे, राव रमेश आणि मुरली शर्मा यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. ‘डीजे’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 115 कोटींचे कलेक्शन केले होते, यासह तो ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. हिंदीत डब केलेला हा चित्रपट यूट्यूबवर 200 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

 रेस गुर्रम: २०१४ साली प्रदर्शित झालेला हा तेलुगू भाषेतील अॅक्शन कॉमेडी चित्रपट, ज्याला हिंदी डबमध्ये ‘लकी-द रेसर’ म्हणून ओळखले जाते, अल्लू अर्जुनचा सर्वोत्कृष्ट आणि अॅक्शन आणि कौटुंबिक भावनांनी परिपूर्ण आहे. जो ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. 100 कोटी रुपयांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनसह. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री श्रुती हसन, रवी किशन आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत होते.

सन ऑफ सत्यमूर्ती: तुम्ही अल्लू अर्जुन आणि दक्षिण भारतीय चित्रपटांचे चाहते असाल, तर तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक आहे.सन ऑफ सत्यमूर्ती हा 2015 चा तेलगू अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्यात अल्लू अर्जुनसह सामंथा अक्किनेनी, नित्या मेनन, अदा शर्मा आणि ब्रह्मानंदन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट देखील हिंदी भाषेत प्रदर्शित झाला नाही पण या चित्रपटाने जगभरात 90 कोटी कमावले आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here