आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

गोव्याची विधानसभा निवडणूक सर्वांत जास्त चर्चेत आलीय ती पंजीमच्या तिकिटामुळे…


गोव्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय खलबते सुरू झाली आहेत. राज्यात १४ फेब्रुवारी रोजी निवडणुका प्रस्तावित आहेत. अशा स्थितीत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. सध्या मतदार संघातील जागा वाटपाच नियोजन जो तो  पक्ष करू लागला आहे. काही ठिकणी जाहीर केलेल्या जागांच्या संदर्भात निषेधाचे आवाजही वेगाने उठू लागले आहेत. मात्र सध्या गोव्यात एका मतदार संघातील जागेवरून चांगलाच वाद पेटलाय. तो मतदार संघ म्हणजे ‘पंजीम’.पंजीम मधून उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी चक्क दोन दिग्गज एकमेकांसमोर आलेत.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे पणजी मतदारसंघावर सातत्याने दावा करत आहेत. तर भाजपचे नेते बाबुश मोन्सेरात या जागेवरील आपला दावा सोडायला तयार नाहीत. बाबूश यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

उत्पल पर्रीकर यांनी दोन महिन्यांपूर्वी पणजीतून प्रचाराला सुरुवात केली होती. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आपल्या उमेदवारीचा विचार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यांनी घरोघरी जाऊन प्रचारही सुरू केला आहे. याशिवाय ते बूथ स्तरावरील बैठकाही घेत आहेत. गेल्या आठवड्यात बाबूश मोन्सेरात यांनी गोव्यात भाजपसोबत राहनार असल्याचे सांगताच, उत्पल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याचा आपला इरादाही स्पष्ट केला. त्यामुळे आता तिकीट नक्की कोणाला द्यायचं यावरून भाजपमध्येच संभ्रम निर्माण झालाय..

विधानसभा

 

या मुद्द्यावर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची देखील भेट घेतली. उत्पल म्हणाले, ‘मी नड्डा यांना सांगितले आहे की भाजपचे मुख्य कार्यकर्ते आणि मतदार माझ्यासोबत आहेत. मला पणजीमध्ये चांगला पाठिंबा मिळत आहे.’नड्डा यांनी या संदर्भात मला कोणताही सल्ला दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. उत्पल पर्रीकर यांच्या वडिलांचा मतदार संघ असलेल्या पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवायची होती. पण भाजपने कुटुंबवादाला चालना न देण्याच्या नावाखाली उत्पल पर्रीकर यांना तिकीट देण्यास स्पष्ट नकार दिला.

जोपर्यंत मनोहर पर्रीकर हयात होते तोपर्यंत उत्पल यांनी राजकारणात रस दाखवला नाही. मात्र आता ते वडिलांच्या राजकीय वारशावर आपला दावा सातत्याने मांडत आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी पणजीची जागा न मिळाल्यास कठोर पाऊल उचलू शकतो असे म्हटले होते. सध्या दोघेही पणजी मतदारसंघातून आपला दावा करत आहेत. या जागेसाठी भाजपला आता उत्पल आणि विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यापैकी एकाची निवड करायची आहे. मॉन्सेरेट यांनी 2019 मध्ये त्यांची पत्नी जेनिफर मॉन्सेरेटसह इतर 9 आमदारांसह काँग्रेसमधून भाजप सत्ताधारी पक्षात प्रवेश केला होता.

भाजप आता या जागेवर कोणाला संधी देतंय हे पाहणे रंजक ठरणार आहे.


=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here