आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

विवो कंपनीला टक्कर देत आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे हक्क आता टाटानं मिळवलेत…


IPL 2022 सुरु होण्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलचा टायटल स्पॉन्सर बदलण्यात आला आहे. आयपीएलच्या आयोजकांनी विवो या चिनी कंपनीकडून टायटल स्पॉन्सर हिसकावून ते आता भारतीय कंपनी टाटाला दिले आहे. आयपीएलचे टायटल स्पॉन्सर म्हणून आता टाटाचं नाव मैदानात झळकणार आहे.

भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेला टाटा समूह चीनी मोबाईल निर्माता Vivo ऐवजी यावर्षीपासून IPL चा प्रायोजक करेल. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयला सांगितले की टाटा समूह आता आयपीएलचे प्रायोजकत्व करेल.

Vivo ने 2018 ते 2022 या कालावधीत 2200 कोटी रुपयांना IPL प्रायोजकत्व हक्क विकत घेतले होते परंतु 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीन यांच्यातील लष्करी संघर्षानंतर विवोने एक वर्षाचा ब्रेक घेतला. त्याच्या जागी Dream11 प्रायोजक होते.

टाटा

त्यानंतर आता 2022च्या आयपीएल साठी विवो एवजी टाटा ग्रुपला प्रायोजकत्व देण्यात आलंय.आयपीएल 2022मध्ये एकूण दहा संघ सहभाग नोंदवणार असून त्यात नव्याने सामील झालेले दोन संघ अहमदाबाद आणि लखनौ यांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे येणारी आयपीएल स्पर्धा रंगतदार होणार एवढ मात्र नक्की..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

 

व्हिडीओ प्लेलिस्ट :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here