आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मुंबईतील या पोरानं वयाच्या 13 व्या वर्षी करोडोंची उलाढाल करणारी कंपनी बनवलीय….


आयुष्यात प्रचंड यशस्वी व्हायचं आणि नाव कमवायचं हे जवळपास सर्वच लोकांच स्वप्न असत. परंतु हे स्वप्न पूर्ण करू शकतात ते काही मोजकेच असतात.यासठी लागते ती जिद्द, मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्ती.हे सर्व असूनही तुम्हाला लगेच असं काय सक्सेस मिळत नाही. त्यासाठी आपल्या कामात वेळही देणे तेवढच महत्वाच असते. अश्याच एका उद्योग प्रेमी मुलाची सक्सेस स्टोरी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.हा मुलगा अगदी वयाच्या 23व्या वर्षी करोडोंच्या उद्योगाचा मालक बनलाय.

मुंबईत राहणारा टिळक मेहता वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी करोडोंचा बिझनेस सुरू केला आहे. या मुलाची कहाणी वाचल्यानंतर तुमची खात्री पटेल की, कोणी प्रामाणिक मनाने कष्ट केले तर यश नक्कीच त्याच्या हातात पडते..

मुंबईत राहणारा 13 वर्षीय टिळक मेहताने कमी वयात करोडोंची कंपनी उघडण्याचा पराक्रम करून सर्वांनाच चकित केले आहे. ज्या वयात मुले खेळ आणि अभ्यासात व्यस्त असतात त्या वयात त्याने कंपनी सुरू केली. इयत्ता 8वीत शिकलेला टिळक मेहता हा अभ्यासात सामान्य मुलांसारखाच आहे, परंतु त्याच्या कुशाग्र मनाच्या बळावर त्याने पेपर आणि पार्सल नावाची कंपनी स्थापन केली या कंपनीची वार्षिक उलाढाल 100 कोटींच्या पुढे गेली आहे. या कंपनीच्या यशामागे टिळकची लहान वयात घेतलेली प्रचंड असी मेहनत आहे.

कंपनी

टिळक मेहताने  सुरू केलेल्या पेपर आणि पार्सल कंपनीचे काम म्हणजे ग्राहकांना कमीत कमी वेळेत आणि पैशात स्टेशनरी वस्तू उपलब्ध करून देणे, जेणेकरून कोणत्याही मुलाला त्याच्या अभ्यासात कोणतीही अडचण येणार नाही.

ही पार्सल कंपनी उघडण्याची कल्पना देखील टिळकला एका समस्येमुळेच सुचलेली. जेव्हा त्याला काही पुस्तके हवी होती परंतु कोणत्याही सुविधांमुळे त्याला वेळेवर पुस्तके मिळू शकली नाहीत. यानंतर टिळकने अशी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला, जी लोकांना गरजेच्या वेळी कमी वेळेत आणि पैशात स्टेशनरी वस्तू देऊ शकेल.

खरे तर टिळकचे वडील एका लॉजिस्टिक कंपनीत काम करायचे, एके दिवशी ते ऑफिसमधून खूप थकून घरी परतले. टिळला त्या दिवशी दुकानातून काही पुस्तके आणायची होती, पण तो एकटा जाऊ शकला नाही आणि त्या दिवशी त्याचे वडील खूप थकले होते. अशा परिस्थितीत टिळकनेआपल्या वडिलांना पुस्तके आणण्याची तसदी न घेता स्टार्टअप सुरू करण्याची योजना आखली.

यानंतर टिळकने दुसऱ्या दिवशी व्यवसायाची कल्पना वडिलांना सांगितली, जी त्यांनाही खूप आवडली. यानंतर या पिता-पुत्राने मिळून पेपर आणि पार्सल कंपनीचा पाया रचला आणि एका बँकरला कंपनीत सीईओ पदावर नियुक्त केले, त्यानंतर बँकरने आपली नोकरी सोडली आणि टिळकची कंपनी हाताळण्यास सुरुवात केली.

मुंबईसह आसपासच्या भागात लवकरात लवकर माल पोहोचवण्यासाठी टिळक मेहताने  अत्यंत कमी वेळात माल पोहोचवण्याचे कौशल्य जाणणाऱ्या मुंबईच्या डब्बेवाल्यांची मदत घेतली. पेपर आणि पार्सल कंपनी कोणताही माल पोहोचवण्यासाठी 40 ते 180 रुपये आकारते जे इतर पार्सल कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आणि सोयीस्कर आहे.

अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्टेशनरीशी संबंधित वस्तूंचे पार्सल घ्यावे लागते, तेव्हा तो ऑनलाइन अॅपद्वारे ऑर्डर देऊ शकतो. त्यानंतर डब्बेवाल्यांच्या मदतीने ते पार्सल ग्राहकांच्या घरी पोहोचवले जाते, त्यामुळे कंपनीचे कामही होते आणि डब्बेवाल्यांना जादा कमाईही होते.

अश्या रीतीने एका समस्येतून सुचलेली ही कंपनी आज करोडोंचा उलाढाल करतेय.टिळक मेहताची हुशारी आणि कमी वयात असतांना केलेली ही कामगिरी दोन्हीही कौतुकास पात्र आहेत..


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

 

व्हिडीओ प्लेलिस्ट :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here