आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

यशस्वी कारकीर्द असलेल्या या दुर्देवी खेळाडूंचा त्यांच्या आवडत्या खेळामुळेच मृत्यू झाला होता..


खेळामुळे एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. ही म्हण तुम्ही अनेक लोकांकडून ऐकली असेल.परंतु आज ज्या खेळाडूंबद्दल आपण बोलणार आहोत ते एवढे दुर्देवी होते की त्यांच्या आवडत्या खेळामुळेच त्यांना मृत्यूला सामोरी जावं लागलं होत.

 फिलिप ह्युजेस (क्रिकेट): ऑस्ट्रेलियातील क्रिकेटची क्रेझ वेगळ्याच पातळीवर आहे. गेल्या काही वर्षांपासून तो त्याच्या उत्कृष्ट खेळासाठी आणि खेळाडूंसाठी ओळखला जातोय. असाच एक खेळाडू होता फिलिप ह्युजेस. 2009 मध्ये फिलिपने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात भाग घेतला.

खेळाडू

25 नोव्हेंबर 2014 रोजी फिलिप एक आंतरराज्यीय क्रिकेट सामना खेळत होता. याच सामन्यादरम्यान गोलंदाजाने चेंडू टाकला त्यावर फिलिपला वाटले की मोठा शॉट खेळला पाहिजे. मात्र, त्याच्या नशिबात हा शॉट नव्हता. त्याने बॅट स्विंग केली पण चेंडू सरळ जाऊन त्याच्या हेल्मेटच्या बाजूला लागला. सुरुवातीला सर्वांना वाटले की ही किरकोळ दुखापत आहे, परंतु काही वेळाने फिलिप वेदनेने जमिनीवर पडला.

 

रुग्णालयात दोन दिवस ते कोमात होते. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले पण कोमातच त्याचा मृत्यू झाला.

बेकी झार्लांटिस (बॉक्सिंग): बेकी फावल्या वेळात बॉक्सिंग खेळायची आणि बॉक्सिंगच्या सामन्यांमध्ये भाग घ्यायची. ती नेहमी पूर्ण सुरक्षेसह सामने खेळायची, पण 5 एप्रिल 2005 रोजी तिच्या सुरक्षेने तिला साथ दिली नाही. बेकी एका 31 वर्षीय महिलेशी स्पर्धा करत होती जिने यापूर्वी कधीही बॉक्सिंग सामना लढला नव्हता.

दोन्ही बॉक्सर रिंगमध्ये दाखल झाले आणि सामना सुरू झाला. दोघांमध्ये ठोशांचा पाऊस सुरू झाला. दोन फेऱ्यांपर्यंत सर्व काही सुरळीत चालले होते पण तिसऱ्या फेरीच्या सुरुवातीलाच काहीतरी वेगळे घडले.

प्रतिस्पर्धी मुलीने बेकीच्या नाकावर जोरदार प्रहार केला, ज्यामुळे तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. यानंतर प्रतिस्पर्धी मुलीने   तिच्या शरीरावर आणखी एक जोरदार ठोसा मारला ज्यामुळे ती लगेचच रिंगमध्ये पडली. तिला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेले असता तेथे दिवसभर मृत्यूशी झुंज देऊन शेवटी तिने आपला प्राण सोडला..

टॉड स्किनर ( पर्वतारोहण ): पर्वतारोहण हा अतिशय धोकादायक खेळ मानला जात होता, परंतु टॉड स्किनरने तो एक मस्त खेळ बनवला. एके दिवशी तो योसेमाइट नॅशनल पार्कच्या टेकड्यांवर चढायला गेला.या वेळीही त्याने तेच तंत्र स्वीकारले जे तो पूर्वी अवलंबत होता. मात्र यावेळी त्याने एक छोटीशी चूक केली. थोडं वर गेल्यावर अचानक तो घसरला आणि खाली पडू लागला. त्याचे उपकरण त्याला सुरक्षित करणार होते पण ते सेट नव्हते त्यामुळे टॉड थांबला नाही.तो थेट काही फूट उंच डोंगरावरून खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गंडा

सावधगिरी बाळगा जेव्हा तोंडामध्ये अशी लक्षणे दिसतील, तोंडाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो!

व्हीडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here