आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब
==
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक यांना भारतीय संघ हा एकमेव सामना हरल्याचं सर्वांत जास्त दुखः वाटतंय..
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या कोचिंग कारकिर्दीतील कोणता सामना हरल्याने दु:ख झाल्याचे सांगितले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमावणे ही माझी सर्वात मोठी निराशा असल्याचे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. टीम इंडियाने तो सामना जिंकायला हवा होता असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
रवी शास्त्री यांच्या कोचिंग कार्यकाळात भारतीय संघाने खूप यश मिळवले. द्विपक्षीय मालिकेत संघाने अनेक दिग्गज संघांना पराभूत केले. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाला दोन वेळा ऑस्ट्रेलियात पराभूत केले. ही कामगिरी करणारा भारत हा आशियातील पहिला संघ ठरला आहे.
याशिवाय, संघाने 2019 विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आणि 2021 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. मात्र, अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला.जेव्हा रवी शास्त्रींना विचारले गेले की कोणत्या पराभवाने त्यांना त्यांच्या कोचिंग कारकिर्दीत सर्वात जास्त निराश केले, तेव्हा त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे नाव देऊन उत्तर दिले.

स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणादरम्यान, तो म्हणाला, “जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात हरणे ही माझ्या कार्यकाळातील सर्वात मोठी निराशा होती. याचे कारण म्हणजे तो सामना आम्ही जिंकायला हवा होता कारण आम्ही हरण्याची पात्र नव्हतो.
जिंकता जरी नाही आला तर कमीत कमी ड्रो तरी व्हायला हवा होता. संघाने तस खेळायला हवे होते. आम्ही सलग 5 वर्षे उत्कृष्ट क्रिकेट खेळलो आणि इतके दिवस पहिल्या क्रमांकावर राहणे हा काही विनोद नाही आणि म्हणूनच आम्हाला विश्वास होता की आम्ही तो सामना जिंकणार परंतु आयत्या वेळी सांघिक कामगिरी चांगली न झाल्याने आम्हाला पराभवाचे तोंड पाहावं लागलं. ज्याचं दुखः आजही मनाला सलतेय.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हेही वाचा..
भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गंडा
सावधगिरी बाळगा जेव्हा तोंडामध्ये अशी लक्षणे दिसतील, तोंडाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो!
व्हीडीओ प्लेलीस्ट: