आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

सततच्या फ्लोप शो मुळे आता गबरू रिषभ पंतचही संघातील स्थान धोक्यात आलंय..


भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत  मागील काही दिवसापासून फॉर्ममध्ये नाहीये. गेल्या अनेक सामन्यात तो अपयशी ठरलाय.दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सुद्धा तो संघर्ष करतांना दिसून येतोय.

ऋषभ पंतने आधी आपल्या फलंदाजीने संघात आपली जागा निर्माण केली होती.  मात्र गेल्या काही कसोटी सामन्यांपासून ऋषभ पंतचा फॉर्म खूपच खराब होत आहे. पंत सतत अपयशी ठरत असून त्यामुळे संघासाठी मोठी चिंता निर्माण झाली आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वारसदार मानला जाणारा ऋषभ पंत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने खेळत आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आहे. ऋषभ पंतने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या कठीण दौऱ्यांवर कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम फलंदाजी दाखवली होती पण शेवटच्या 14 कसोटी डावांमध्ये पंतची बॅट पूर्णपणे शांतआहे. आणि मुख्य म्हणजे या सामन्यांत तो चुकीच्या पद्धतीने आपली विकेट देतोय.

ऋषभ पंत

सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तिसऱ्या कसोटी सामन्यातही पंत फार काही करू शकला नाही आणि केवळ 27 धावांचे योगदान देऊन परत आला. या मालिकेत त्याला सलग 5व्या डावात विशेष कामगिरी करता आली नाही, तर शेवटच्या 14 डावात त्याला केवळ एकच अर्धशतक ठोकता आलंय.

या खराब कामगिरीनंतरही ऋषभ पंतला जागेवरच संधी मिळत आहे. संकटकाळात संघासाठी नेहमीच चमकदार फलंदाजी करणारा ऋद्धिमान साहासारखा लढाऊ यष्टिरक्षक पंतला संधी देण्यासाठी बाहेर बसला आहे. साहाने अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत.

ऋद्धिमान साहाने विकेटवर टिकून राहण्याची क्षमता अनेकदा दाखवली आहे. अशा स्थितीत आता ऋषभ पंतला कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान वाचवणे कठीण होणार आहे. पुढील कसोटी मालिकेत भारतीय संघ पंतला बाहेर फेकून ऋद्धिमान साहाला संधी देण्याचा विचार करू शकतो, अशी अपेक्षा आहे.सहाने आतापर्यंत 38 कसोटी सामने खेळले आहेत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गंडा

सावधगिरी बाळगा जेव्हा तोंडामध्ये अशी लक्षणे दिसतील, तोंडाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो!

व्हीडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here