आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

या 7 दबंग पोलीस आयपीएस अधिका-यांनी मोठमोठ्या गुन्हेगार आणि राजकारण्यांना तुरुंगाची हवा खाऊ घातलीय…


कायदे करणे हे सरकारचे काम आहे आणि त्याचीअंमलबजावणी  प्रशासकीय अधिकारी  करतात. अनेक वेळा असे काही अधिकारी असतात जे आपल्या कर्तव्याच पालन करतांना मागचा पुढचा कोणताही विचार करत नाहीत.

कोणत्याही राज्यातील-शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे सोपे नसते आणि आयपीएस अधिकारी हे काम चोख बजावतात. आमचे आणि तुमचे रक्षण करण्यासोबतच गुन्हेगारांशी दोन हात करायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. समाजातील भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप आदींशी लढा देत हे अधिकारी पूर्ण निष्ठेने आपले काम करतात. जाणून घेऊया अशाच काही आयपीएस अधिकाऱ्यांबद्दल जे आपल्या अनोख्या कारनाम्यांमुळे चर्चेत राहिलेत.

सचिन अतुलकर: सचिन अतुलकर वयाच्या २२ व्या वर्षी आयपीएस अधिकारी झाले. त्यांच्या अप्रतिम फिटनेसमुळे ते अनेकदा चर्चेत असतो. ते राष्ट्रीय स्तरावरही क्रिकेटपण खेळले होते.सचिनच्या या काळात त्यांनी अनके मोठ्या गुन्हेगारांना पकडून जेलमध्ये टाकले होते.

  मनु महाराज: बिहारचा सुपरकॉप म्हणून मनु महाराजांची ओळख आहे. ते 2005 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या धाडसी कारनाम्यासाठी ते संपूर्ण प्रदेशात प्रसिद्ध आहे. हे अतिदक्ष पोलीस अधिकारी देशातील तरुणांचे आदर्श आहेत.

गौरव तिवारी: ५०० कोटी रुपयांचा कटनी हवाला घोटाळा उघड करून गौरव तिवारी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. यानंतर त्यांची छिंदवाडाहून दुस-या शहरात बदली झाल्यावर संपूर्ण शहर त्यांची बदली रोखण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.

 शिवदीप लांडे: शिवदीप लांडे हे 2005 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. बिहारमध्ये पोस्टिंग दरम्यान त्यांनी मुलींच्या छेडछाडीपासून वाचवण्यासाठी आपला वैयक्तिक क्रमांक सामाईक केला होता. आजही त्यांच्या नावाने गुन्हेगार घाबरतात.

पोलीस

 संजुक्ता पराशर:  संजुक्ता पराशर यांना आसाम पोलिसांची आयर्न लेडी म्हटले जाते. त्यांनी जंगले पिंजून काढली आणि अनेक अतिरेक्यांना ठार केले आणि अनेकांना जिवंत पकडले होते. शिवाय त्यांनी पोलिसांच्या अनेक धोकादायक ऑपरेशन्सचे नेतृत्व केले आहे.

  श्रेष्ठ ठाकूर: श्रेष्ठ ठाकूर ही यूपी केडरची दबंग आयपीएस अधिकारी आहे. लोक तिला लेडी सिंघम म्हणतात. 2017 मध्ये त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांचे चालान कापले. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. श्रेष्ठही मुलींना स्वसंरक्षणाच्या युक्त्या शिकवत असते.

  सोनिया नारंग: सोनिया नारंग या 2002 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. दावणगेरेच्या एसपी असताना तिने एका तगड्या नेत्याला थप्पड मारली होती त्यानंतर ती चर्चेत आली होती. ज्यानंतर तिच्या अनेक वेळा बदली करण्यात आल्या परंतु तिने आपला स्वभाव आणि कायद्याच रक्षण करण्यात कसलीही कमतरता भासू दिली नाही..

तर हेच ते 7 वीर बहादुर राष्ट्र अणि समाज संरक्षक ज्यानी आपल्या पदाची शान राखत आपली गौरवशाली कामगिरी पार पाडली आणि आजूनही देशसेवेत रुजू आहेत.  जयहिन्द!


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here