आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

आयपीएल 2022 साठी अहमदाबाद संघाने या तीन खेळाडूंना संघात जागा दिलीय…


आयपीएल 2022 ची क्रेझ आता आणखीनच वाढत आहे. कारण यावर्षी आयपीएलमध्ये दोन नवे संघ भाग घेणार आहेत. त्यातील एक म्हणजे अहमदाबाद. अहमदाबाद संघाने  मेगा लिलावापूर्वीभारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या, सलामीवीर शुभमन गिल आणि अफगाणिस्तानचा लेगस्पिन गोलंदाज राशिद खान यांचा त्यांच्या संघात समावेश केला आहे.

या फ्रँचायझीने हार्दिक आणि रशीदला १५-१५ कोटी, तर शुभमन गिलला सात कोटी दिले आहेत. मेगा लिलावापूर्वी, आता या फ्रेंचायझीकडे 53 कोटी रक्कम शिल्लक आहे.

आयपीएल

दोन्ही नवीन संघांना त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी 22 जानेवारीपर्यंत वेळ देण्यात आला होता. अशा परिस्थितीत अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक, रशीद आणि शुभमन यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय हार्दिक पांड्याकडेया संघाची कमान सोपवली जाण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा हार्दिक संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

सोबतच अहमदाबाद फ्रँचायझीने आपल्या कोचिंग स्टाफचीही निवड केली आहे. या संघात आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन ही भूमिका साकारताना दिसणार आहेत, तर इंग्लंडचे माजी फलंदाज विक्रम सोळंकी यांची संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल हे आयपीएलच्या इतिहासात खूप यशस्वी खेळाडू आहेत आणि तिघांनीही आपापल्या फ्रँचायझींसाठी चमकदार कामगिरी केली आहे. अशा स्थितीत अहमदाबाद संघालाही या खेळाडूंकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here