आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

सुपरस्टार सुरीयाच्या ‘जयभीम’ चित्रपटाचे तो विक्रम केलाय, जो आजपर्यंत कोणत्याही भारतीय चित्रपटाला करता आलेला नाहीये..


सुपरस्टार सुरियाचा काही दिवसापूर्वीच ओटीटी  रिलीज झालेला चित्रपट ‘जयभीम’ चांगलाच गाजला होता. चित्रपटाने अनेक विक्रम करत आपलं नाव जगभर प्रसिद्ध केले होते. कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट बराच पुढे सरकला होता. यानंतर आता सुरीयाच्या आणि या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आलीय.

जयभीम चित्रपटाने आता असा एक विक्रम केलाय जो आजपर्यंत कोणताही भारतीय चित्रपट करू शकला नाहीये. तो विक्रम म्हणजेच ‘ऑस्करच्या युट्युब चॅनेलवर स्ट्रीम होणे. जयभीम हा एकमेव असा भारतीय चित्रपट बनलाय जो आता ऑस्करच्या युट्युबचॅनेलवर चालवला जाणार आहे.

ही बातमी सुरिया आणि चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी नक्कीच एक मोठ यश मानव लागेल. याआधी जयभीम आयएमडीबीवर २०२१ मधील सर्वांत आवडता चित्रपट बनला होता.

‘जय भीम’ हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अन्यायग्रस्त कुटुंब आणि त्यांच्या पाठिशी खंबिरपणे उभा राहणारा वकिल यांचा प्रस्थापितांविरुद्धचा संघर्ष अशी या सिनेमाची गोष्ट आहे. हा सिनेमा मागच्या वर्षी लाखो चाहत्यांच्या पसंतीस उतरला.

जय भीम

‘जय भीम’ चित्रपट 4 नोव्हेंबर 2021 ला Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे बजेट 10 कोटींहून अधिक होते आणि साऊथचा सुपरस्टार सुर्याने या चित्रपटात न्यायमूर्ती चंद्रूची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई या चित्रपटाने केलीय.

एकंदरीत नव्या वर्षातील या अभूतपूर्वक यशाने सुरीयासह निर्माते आणि चित्रपटाचे चाहतेही आनंदात आहेत..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here