आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

कोरोनाच्या लसीमुळे गेल्या 4 वर्षांपासून अंथरुणावर पडून असलेला हा व्यक्ती ठणठणीत बरा झालाय…


कोरोनाच्या (कोविड-19) तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन देशभरात लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. अशा परिस्थितीत झारखंडमधून कोरोना लसीशी संबंधित एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे अर्धांगवायूच्या रुग्णाला कोरोनाची लस देण्यात आली होती.दुसऱ्याच दिवशी तो उठला आणि चालायला लागलाय.

4 वर्षांपासून बेडवर पडलेला अर्धांगवायूचा रुग्ण अचानक कसा बरा झाला हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. यापूर्वी देखील कोरोना लसीने पक्षाघात झालेले रुग्ण बरे झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.या प्रकरणामुळे आता तो व्यक्ती परिसरात चांगलाच चर्चेचा विषय बनलाय..

हे प्रकरण झारखंडमधील बोकारो येथील सालगदीह गावातील आहे. या गावातील ५५ वर्षीय दुलारचंद मुंडा यांना गेली चार वर्षे अंथरुणातून उठताही येत नव्हते. पण आता असा दावा केला जात आहे की कोरोना लसीच्या एका डोसने तो पूर्णपणे बरा झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांना कोरोनाच्या कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.

लस घेतल्याने झालेला परिणाम पाहून त्याला स्वतःवरच विश्वास बसत नाहीये. याविषय विचारल्यास दुलारचंद म्हणाले की, ‘ही लस घेऊन करून मला खूप आनंद झाला आहे’. 4 जानेवारीला लस घेतल्यानंतरमला आता उठून उभेही राहता येतंय. त्यामुळे खूप आनंदी असं वाटतंय.

रस्ता अपघातानंतर त्याला चालताही येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. ही चमत्कारिक घटना पाहिल्यानंतर बोकारोचे डॉक्टरही त्याचा वैद्यकीयरिपोर्ट पाहिल्यानंतर शास्त्रज्ञांना यावर संशोधन करावे लागेल, असे सांगत आहेत.

बोकारोच्या सिव्हिल सर्जनने या मुद्द्यावर तीन सदस्यीय वैद्यकीय पथकही तयार केले आहे, जे या ‘चमत्कारिक पुनर्प्राप्ती’ घटनेची चौकशी करणार आहेत. सिव्हिल सर्जन डॉ जितेंद्र कुमार यांनी मुंडा यांच्यासोबत झालेल्या चमत्काराबाबत म्हटले आहे की, ‘हे पाहून मी थक्क झालो आहे…. शास्त्रज्ञांना याचा शोध घ्यावा लागेल. तो काही दिवस आजारातून बरा झाला असता तर समजू शकले असते, पण 4 वर्षांचा आजार लस दिल्यानंतर अचानक बरा झाला तर विश्वास बसत नाही.

कोरोना

एकंदरीत या  प्रकरणामुळे डॉक्टरही चकित झाले आहेत तर दुसरीकडे दुलारचंद मात्र लसीचा पहिला डोस घेतल्याने झालेले फायदे पाहून आनंदात आहे..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here