आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा प्रवास खूपचं प्रेरणादायी ठरलाय…


भारतीय फुटबॉलच्या इतिहासात बायचुंग भुतियानंतर कोणत्याही फुटबॉलपटूचे नाव येत असेल तर ते भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री! कर्णधार सुनील छेत्रीचा जन्म ३ ऑगस्टला 1984 रोजी नेपाळमधील सिकंदराबाद जिल्ह्यात झाला. त्याची आई आणि बहीण नेपाळ महिला संघाकडून फुटबॉल खेळल्या आहेत. कदाचित त्यामुळेच त्याची आवडही या खेळाकडे वळली असावी!

बरं, आज सुनील छेत्री हा भारताचा सर्वात महागडा फुटबॉलपटू असेल, पण एक काळ असा होता जेव्हा तो काही पैशांसाठी चोरी करायचा. त्याने स्वत: ‘फुटबॉल क्लब बेंगळुरू एफसी’ला याचा खुलासा केला. त्याने सांगितले की, लहानपणी एकदा मी घरात चोरी केली होती, कारण त्याला पैशाची नितांत गरज होती. खरं तर, त्याने आईकडे 50 रुपये मागितले, जे त्याच्या आईने देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने ती चोरली. नंतर जेव्हा आईला हे कळाले तेव्हा तिने छेत्रीला खुर्चीला बांधून खुप मारहाण केली!

२००१ मध्ये झालेल्या एशियन स्कूल चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळाली. शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर फुटबॉल त्याचा मित्र बनला! आणि हेच त्याचे जिवन घडविणारे ठरले. सरावाला जाताना ते बसचे  तिकिटाविना प्रवास करत असत. खरे तर ते पैसे तो त्याच्या पॉकेटमनीसाठी वाचवत असे!

हा प्रवास एवढ्यावरच थांबला नाही. 2008 AFC चॅलेंज कपमध्ये, त्याने ताजिकिस्तानविरुद्ध 3 गोल करून भारताला 27 वर्षांनंतर आशिया कपमध्ये प्रवेश करण्यास मदत केली. सुनील आपल्या टॅलेंटने चाहत्यांना वेड लावत राहिला.

यानंतर, त्याने 2010 मध्ये परदेशी फुटबॉल क्लब कॅन्सस सिटी विझार्ड्सकडून खेळून तिस-या भारतीय फुटबॉल खेळाडूंमध्ये आपले नाव नोंदवले. याआधी मोहम्मद सालेम आणि बायचुंग भुतिया यांनी हा पराक्रम केला होता.

सुनील छेत्री

सुनील छेत्रीला 2007, 2011, 2012 आणि 2014 मध्ये AIFF चा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. अशी कामगिरी करणारा तो ४ वेळा भारतीय ठरला. यासह सुनील भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे. म्हणूनच अर्जुन पुरस्कारा सारख्या मोठ्या सन्मानानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

जगभरात फुटबॉलसाठी भारताचे नाव घेतले जात नाही, पण या प्रतिभावान खेळाडूने आपल्या खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळप्रेमींच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.अलीकडेच त्याने 102 सामन्यांमध्ये 64 आंतरराष्ट्रीय गोल करत अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू मेस्सीची बरोबरी केली आहे.

छेत्रीने 4 डिसेंबर 2017 रोजी त्याची गर्लफ्रेंड सोनम भट्टाचार्यसोबत लग्न केले.
सोनम ही भारतीय फुटबॉलपटू सुब्रता भट्टाचार्य यांची मुलगी आहे. सुब्रत भट्टाचार्य हे छेत्री च्या मोहन बागान क्लबचे प्रशिक्षक होते. त्यादरम्यान त्याची सोनमशी भेट झाली आणि पुढे दोघांची मैत्री झाली. त्यानंतर दोघेही अनेक दिवस प्रेमसंबंधात होते आणि नंतर लग्नगाठ बांधली.

छेत्री भारतीय फुटबॉलपटू बायचुंग भाटियाला आपले प्रेरणास्थान मानतो आणि ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोला आपला आवडता खेळाडू मानतो. रोनाल्डोचा वेग आणि क्षमता आणि त्याचे रेकॉर्ड त्याला प्रेरणा देतात.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here