आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

टोमॅटो विकून वर्षात 8 कोटी कमावणाऱ्या या शेतकऱ्याच्या भेटीला स्वतः कृषीमंत्री पोहचलाय…


‘टोमॅटो, मिरची, आले पिकवून शेतकरी झाला करोडपती’ असं जर तुम्हाला कुणी सांगितल तर तुमचा विश्वास बसणार नाही. कारण साहजिकच आहे ते म्हणजे आजकाल मार्केटमधील सुरु असलेले या गोष्टींचे भाव. सध्या शेतीमालाला एवढा कमी भाव असतोय की शेती करून कुणी करोडपती  होईल असं स्वप्नातही वाटत नाहीये.

पण अशी एक घडला घडलीय जी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतेय. मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील शेतकरी मधुसूदन धाकड यांनी सांगितले की त्यांनी यावर्षी 8 कोटी रुपयांचे टोमॅटो विकले आहेत. त्यांना टोमॅटो, मिरची, सिमला मिरची आणि आले या पिकांच्या लागवडीतून सरासरी 10 लाख रुपये प्रति एकर उत्पन्न मिळालय.

आता यात अशक्य असं त्यांना काहीच वाटलं नाही असं ते सांगतात. पण यांची ही कामगिरी पाहून चक्क कृषीमंत्रीच त्यांची मुलाखत घ्यायला घरी पोहोचलेत..

टोमॅटो

पारंपरिक शेती सोडून हरदा जिल्ह्यातील संयुक्त शेतकरी कुटुंबाने बागायती पिकांची निवड केली. यातून कोटय़वधींची कमाई तर झालीच पण शेकडो शेतमजुरांच्या रोजगाराचे कायमस्वरूपी साधनही बनले. मध्य प्रदेशचे कृषी मंत्री कमल पटेल यांनी या शेतकरी कुटुंबाची भेट घेतली आणि पत्रकारांप्रमाणे त्यांची मुलाखत घेतली, त्यांची यशोगाथा समजून घेतली आणि त्यांचे कौतुक केले.

मधुसूदन धाकड नावाच्या या शेतकऱ्याने टोमॅटो, सिमला मिरची, आल्याची लागवड केली आहे. या शेतकऱ्याने 60 एकरात मिरची, 70 एकरात टोमॅटो आणि 30 एकरात आल्याची लागवड केली आहे. यामध्ये एकरी सरासरी 8 ते 10 लाख रुपयांचा नफा झाला आहे. गहू, सोयाबीन ही पारंपारिक पिके सोडून दिली आहेत. मंत्र्यांशी झालेल्या संवादात धाकड यांनी सांगितले की, यावर्षी त्यांनी एकट्याने आठ कोटी रुपयांचे टोमॅटो विकले आहेत.

आलेला एकरी ८० हजार रुपये खर्च आल्याचे सिरकांबा गावातील या शेतकऱ्याने सांगितले. दर चांगला मिळाल्यास एकरी 5 ते 7 लाख रुपयांचा परतावा मिळेल. दर खूपच कमी असला तरी एकरी 3 लाख रुपयांपेक्षा जास्त दर मिळतो. कापणी साधारण आठ महिने असते. तसेच वाईट स्थितीतही एकरी किमान अडीच लाख रुपयांचा फायदा होणार आहे.

यंदा टोमॅटोमध्ये एकरी १२ ते १४ लाख रुपयांचा परतावा मिळत असल्याचे धाकड यांनी सांगितले. सुमारे आठ कोटी रुपयांच्या टोमॅटोची विक्री झाली आहे. तर एकरी दोन लाख रुपये खर्च आला. मिरची शेतीत सात ते आठ लाख रुपयांचा परतावा आला आहे. येथे 350 कामगारांना रोजगार मिळाला आहे.

प्रगतीशील शेतकरी मधुसूदन धाकड यांचे कुटुंब संयुक्तपणे शेती करतात. गेल्या काही वर्षांपासून या शेतकरी कुटुंबाने शेतीची पद्धत बदलली आहे. त्यांचे हे एक पाऊल फायदेशीर ठरले आहे. गहू, हरभरा, सोयाबीन या पारंपरिक पिकांऐवजी या शेतकरी कुटुंबाने फळबागांची निवड केली आणि आपल्या 150 एकर जमिनीवर टोमॅटो, भुईमूग, मिरची, सिमला मिरची, आले पिकवून समृद्धीचा नवा मार्ग खुला केला.या कुटुंबाच्या कामगिरीने खुश होऊन स्वतः कृषीमंत्री त्यांच्या भेटीला पोहचले होते..

एकंदरीत तर काय तुमच्यात जिद्द आणी चिकाटी असेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत स्वतःला सिद्ध करू शकता. हा धडाच या शेतकऱ्याने सांगितलाय..


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here