आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

मोदिजीनंतर आता कृणाल पांड्याचं ट्वीटर अकाऊंट हॅक करून हॅकर्सने त्याच्या चाहत्यांकडे बिटकॉईनची मागणी केलीय..


भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याचा काळ फारसा चांगला जात नाही. या डावखुऱ्या अष्टपैलू खेळाडूला गेल्या वर्षभरापासून भारतीय संघात स्थान मिळत नाहीये. त्याला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनेही सोडले होते. त्याचवेळी देशांतर्गत क्रिकेट खेळतांना बडोद्यासोबत त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती आणि आता सोशल मीडियावरही  त्याला विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

कृणालचे ट्विटर अकाउंट गुरुवारी २७ जानेवारीला हॅकर्सच्या हाती लागले. हॅकर्सनी कृणालच्या ट्विटर अकाऊंटवर कब्जा मिळवला आणि त्यातून अनेक ट्विट केले, ज्यामुळे क्रुणालच्या फॉलोअर्सना आश्चर्याचा धक्का बसला.

30 वर्षीय अष्टपैलू क्रुणालच्या अकाऊंटवरून अनेक प्रकारचे ट्विट करण्यात आले. सुरुवातीला हे ट्विट चुकून केले आहे असे फॉलोअर्सना वाटले, पण नंतर एकामागून एक अनेक धक्कादायक आणि काही आक्षेपार्ह ट्विट आल्यावर हॅकर्सनी हे अकाऊंट हॅक केल्याच समजले. हे सर्व हॅकिंग सकाळी 7.30 च्या सुमारास सुरू झाले आणि लवकरच एक ट्विट आले, ज्यामध्ये असे लिहिले  होते. ‘हॅक्ड बाय @झोरी’. यावरून कृणाल पांड्याच अकाऊंट अखेर हॅक झाल्याचं सिद्ध झालं.

कृणाल पांड्या

हॅकर एवढ्यावरच थांबला नाही तर कृनालच्या अकाऊंटवरून चाहत्यांकडे बिटकॉईनची मागणीही करू लागला. गेल्या काही महिन्यांत, हॅकर्सनी ट्विटर अकाउंट हॅक करून वापरकर्त्यांना क्रिप्टोकरन्सी पाठवण्याची विनंती केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कृणालच्या खात्यावरही असेच काही केले. हॅकरने एक ट्विट केले, ज्यामध्ये लिहिले होते – “हे खाते बिटकॉइनसाठी विकत आहे. यानंतर, पुढच्याच ट्विटमध्ये, हॅकरने एक लांब आणि विचित्र कोड पोस्ट केला आणि लिहिले – “मला बिटकॉइन पाठवा.

हे समजल्यावर काही वेळातच कृणाल पांड्याचे खाते हॅकर्सच्या तावडीतून मुक्त झाले आणि ते पुन्हा कृणालच्या ताब्यात आले, परंतु त्याने कोणतेही विधान जारी केले नाही. पण अशाप्रकारे हॅकर्सच्या तावडीत आलेला तो एकमेव व्यक्ती नाही. डिसेंबर २०२१ मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आले होते आणि त्यात लिहिले होते की बिटकॉइनला भारतात कायदेशीर मान्यता मिळाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचे ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आले होते आणि त्यावेळीही हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here