आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

हा अफगाण पठाण मुंबईचा पहिला माफिया डॉन बनला होता..


खरतर काही वर्षापूर्वी मुंबई ही मुंबई नव्हती, दाऊदचा जन्मही त्यावेळी झाला नव्हता, तेव्हापासून मुंबई अंडरवर्ल्डच्या काळ्या दुनियेत आहे. तेव्हाही अनेक धोकादायक माफिया मुंबईवर राज्य करत असत.  आज आपण मुंबईत अंदरवर्ल्ड सुरु करणाऱ्या पहिल्या डॉन बद्दल जाणून घेणार आहोत तो डॉन म्हणजेच ‘करीम लाला’.

अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’ या प्रसिद्ध चित्रपटातील खलनायक प्राण म्हणजेच शेरखानच्या व्यक्तिरेखेवर करीम लाला यांचा प्रभाव होता. त्याच करीम लालाची डॉन बनण्याची ही स्टोरी..

1940-1950 साल त्यावेळी मुंबईला बॉम्बे म्हणत. मुंबईच्या पहिल्या डॉनचा विचार केला तर बहुतेकांच्या आठवते हाजी मस्तानचे नाव, पण फार कमी लोकांना माहित आहे की मुंबईचा -‘पहिला’ डॉन अब्दुल करीम खान शेरखान होता. अफगाणिस्तानी एक पठाण, ज्याचे नाव ‘शेरखान’ 50 च्या दशकात मुंबईतील प्रत्येक मुलाला माहित होते.

7 फूट उंच, गोरा रंग, नेहमी पठाणी सूट घालणारा शेरखान पठाण, ज्याने बॉम्बेला डॉन शब्दाचा अर्थ पहिल्यांदा सांगितला होता. मूळचा अफगाणिस्तानच्या कुनार प्रांताचा शेरखान भारतात आणि नंतर मुंबईत पैसे कमावण्याची शक्यता शोधत आला होता.

डॉन

मारामारी, दंगल, दारू, रोजची कामे झाली. करीम लाला आणि बॉम्बेचा दुसरा डॉन हाजी मस्तान या दोघांची खासियत होती. दोघांचा शत्रूपेक्षा मित्र बनवण्यावर विश्वास होता. आता रोज पोलीस आल्यावर लालानेही पोलिसांशी मैत्री केली. आता लालाला थांबवायला कुणीच नव्हतं.

लालाने त्यानंतर त्या काळातील सर्वोत्तम चालणा-या काळ्या धंद्यात म्हणजेच तस्करीत पाऊल ठेवले. 40 च्या दशकाच्या अखेरीस लालाने हिरे आणि सोन्याच्या तस्करीत आपले पाय रोवले. तस्करी व्यवसायातून पैसा येऊ लागला तेव्हा लालाने मुंबईत जुगार आणि दारूचे आधुनिक अड्डे उघडले.

हाजी मस्तान मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून तस्करी करायचा. पण हाजीलाही मुंबईवर राज्य करायचे होते आणि त्यासाठी त्याला मसल पॉवरची गरज होती. त्यासाठी त्यांनी करीम लाला यांच्याकडे हात पुढे केला. त्यावेळी करीम लालाची ‘पठाण गँग’ मुंबईभर बदनाम होती. मग काय, दोघांची मैत्री झाली आणि दोघेही मित्र मुंबईवर राज्य करायला निघाले. आता तस्करीसाठी बॉम्बेच्या गोदीत जे काही माल यायचा त्याला लालाची मुलं सुरक्षा पुरवायची.

यानंतर मुंबईचा डॉन शेरखान पठाण उर्फ ​​करीम लाला यांनी एक प्रकारे निवृत्ती घेतली. त्यानंतर करीम लालाने कुठलेही बेकायदेशीर काम केले नाही आणि 19 फेब्रुवारी 2002 रोजी करीम लाला या त्याच्या काळ्या दुनियेतुन अल्लास प्यारे झाले.

अशा प्रकारे बॉम्बेचा पहिला डॉन मुंबई बनलेल्या बॉम्बेलापण निरोप दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here