आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारतीय संघातील यजुवेंद्र चहलची जागा घेऊ शकतो हा युवा खेळाडू, दिनेश कार्तिकने सांगितले खेळाडूचे नाव….


भारतीय संघात सध्या जागा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष सुरु आहे. एकापेक्षा एक सरस खेळाडू सध्या उपलब्ध असल्यामुळे नवीन खेळाडूंना संघात जागा मिळणे कठीण होऊन बसलंय.

काही दिवसापूर्वीच वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईची पहिल्यांदाच वरिष्ठ संघात निवड झाली आहे. प्रथम अंडर-19 विश्वचषक आणि नंतर आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या बिष्णोईचे सगळेच चाहते झाले आहेत, त्याची गोलंदाजी पाहता टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने मोठा दावा केला आहे.

काही काळापासून युवा खेळाडूंना टीम इंडियामध्ये संधी मिळत आहे, तर हे युवा खेळाडूही या संधीचा चांगल्या पद्धतीने फायदा घेत आहेत. प्रत्येक नवीन मालिकेतून काही युवा खेळाडू पदार्पण करत आहेत, तर दुसरीकडे टीम इंडियासोबत दीर्घकाळ राहिलेल्या खेळाडूंना डावलले जात आहे. त्यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र यावेळी दिनेश कार्तिकने खरपूस भाष्य केले आहे.

यजुर्वेद चहल

चहलची जागा रवी बिश्नोई सहजघेऊ शकतो – कार्तिक.

दिनेश कार्तिकच्या मते, चहलच्या जागी राहुल चहरही पुढे आहे. पण सध्या या दाव्यात रवी बिश्नोई राहुल चहरच्या पुढे आहे. शिवाय, युझवेंद्र चहल नशीबवान आहे की त्याला अद्याप संघातून वगळण्यात आलेले नाही.असंही कार्तिक म्हणाला.

क्रिकेटसोबतच कॉमेंट्रीच्या विश्वातही आपला ठसा उमटवणाऱ्या दिनेश कार्तिकने नुकतेच एक महत्त्वाचे विधान केले होते, ज्यामध्ये त्याने पुनरागमनाबद्दल सांगितले होते. जिथे कार्तिक म्हणाला होता की त्याला अजूनही टीम इंडियासाठी खेळायचे आहे आणि त्यासाठी तो कठोर प्रशिक्षण घेत आहे. तसेच पुढे बोलताना या यष्टिरक्षक-फलंदाजाने सांगितले की, त्याला टी-२० मध्ये फिनिशरची भूमिका साकारायची आहे, परंतू संघातील युवा खेळाडूंची कामगिरी पाहता कार्तिक साठी हे मोठ आव्हान असेल..


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. 16 वर्षांच्या खेळाडूने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; सर्वांत लहान वयात ठोकले अर्धशतक!

या कारणामुळे दिनेश कार्तिकने रिषभ पंतची तुलना सहवाग आणि गिलक्रिस्टशी केली…!

WTC Final:या ३ गोलंदाजांना मिळेल फायनलमधी संधी, दिग्गज खेळाडू अजित आगारकरचे भाकीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here