आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे या 3 खेळाडुंच कसोटी संघातील स्थान जाणार, टीम इंडिया घेणार मोठा निर्णय…


काही दिवसापूर्वीच भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका २-१ ने गमावली. प्रोटीज सध्या बदलाच्या काळातून जात आहे आणि अॅनरिक नॉर्चिया या कसोटी मालिकेत खेळला नाही. दुसरीकडे, भारतीय संघ आफ्रिकेपेक्षा खूप मजबूत होता आणि त्यामुळे अनेकांनी कसोटी मालिका जिंकणार असल्याचे सांगितले.

मैदानात मात्र या उलट चित्र पाहायला मिळाले. या मालिकेत अनेक मोठे खेळाडू धावा करण्यात अपयशी ठरले. ज्यात प्रामुख्याने जुन्या खेळाडूंना चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. आजच्या या लेखात आपण अश्याच ३ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची मागील कामगिरी पाहता त्यांना येणाऱ्या कसोटी  मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

टीम इंडिया

अजिंक्य रहाणे: अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने 22.66 च्या सरासरीने केवळ 136 धावा केल्या. त्याची सातत्यपूर्ण खराब कामगिरी लक्षात घेता रहाणेला आपले स्थान गमवावे लागणार हे निश्चित आहे.

परदेशी खेळपट्ट्यांवर तो चांगला फलंदाज मानला जात असल्याने अनेकांना त्याच्याकडून दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती. मात्र रहाणेचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला.


हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

————————————————————————————————–

त्याच्या खराब कामगिरीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या देशांतर्गत कसोटी मालिकेत त्याचा संघात समावेश होण्याची फारशी आशा नाही. त्याच्या बदलीसाठी भारताकडे अनेक खेळाडू उपलब्ध आहेत आणि त्यामुळे रहाणेला संघातून काढण्यास   व्यवस्थापनाला फारसा विचार करावा लागेल असं वाटत नाही.

टीम इंडिया

 चेतेश्वर पुजारा: पुजाराही दक्षिण आफ्रिकेत धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसला आहे. तो प्रोटीयाविरुद्ध २०.६६ च्या सरासरीने १२४ धावाच करू शकला. तो खराब फॉर्ममधूनही जात असून ही कामगिरी त्याच्यासाठी धोक्याची ठरू शकते. कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये क्रमांक 3 हे महत्त्वाचे स्थान आहे.

भारतीय संघाला या वर्षी अनेक मोठ्या कसोटी मालिका खेळायच्या आहेत आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपही सुरू आहे. अशा परिस्थितीत व्यवस्थापन हनुमा विहारीला तिसऱ्या क्रमांकावर संधी देऊ शकते. शुभमन गिललाही या क्रमांकावर खेळवण्याचा प्रयत्न करता येईल. त्यामुळे पुजाराची मागील काही डावांची कामगिरी पाहता पुजारा येणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा भाग नसेल हे नक्की मानलं जातंय.

टीम इंडिया

 इशांत शर्मा: इशांत शर्माला दक्षिण आफ्रिकेत एकही सामना खेळायला न मिळाल्याने त्याचे स्थान गमावणे अयोग्य ठरेल. मात्र गेल्या दोन वर्षांपासून इशांतचा फॉर्म निराशाजनक आहे. तो दुखापतींशीही झुंज देत आहे आणि यामुळे त्याच्या फॉर्मवर परिणाम झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताकडे बरेच पर्याय आहेत आणि त्यामुळे इशांतची निवड खूप कठीण आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा किंवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जन नागवासवालाला संधी दिली जाऊ शकते.

इशांतचा फॉर्म जरी चांगला असला तरीही तो शारीरिक दृष्ट्या नक्कीच फीट नाहीये. त्यामुळे जर इशांत शर्माला पुढील कसोटी मालिकेत आपल स्थान वाचवायचं असलं तर आधी त्याला स्वतःला निवड समितीसमोर फिटनेस चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवावी लागेल.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here