आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

एकही सामना न खेळता सचिनच्या मुलाला मुंबई इंडियन्सने दीड पट पैसे देत खरेदी केलंय..


इंडियन प्रीमियर लीग वर्ष 2022 च्या मेगा लिलावाच्या शेवटच्या दिवशी अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला, तर संघांनी काही खेळाडूंवर सरासरी पैसे खर्च करून त्यांना जोडले. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले आहे.

यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपये दिले आहेत. मेगा लिलावात या युवा अष्टपैलू खेळाडूची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

Mumbai Indians ne Sachin Tendulkar ke bate Arjun ko IPL neelami me kharida; Arjun  Tendulkar Sold To MI: अर्जुन तेंदुलकर पर मुंबई इंडियंस ने फिर लगाया दांव,  इतने में खरीदा - Navbharat

यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपये दिले आहेत. मेगा लिलावात या युवा अष्टपैलू खेळाडूची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

IPL मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्स संघाने 22 वर्षीय अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली. या खेळाडूला खरेदी करण्याच्या शर्यतीत मुंबईशिवाय गुजरात टायटन्सचा संघही सामील होता, पण शेवटी मुंबई इंडियन्सचा डाव लागला.

अशा परिस्थितीत अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे. २०२१ च्या आयपीएल दरम्यान अर्जुन तेंडुलकरही मुंबईच्या संघाशी जोडला गेला होता आणि २०२० च्या आयपीएलमध्ये हा युवा खेळाडू मुंबई  इंडियन्ससोबत यूएई दौऱ्यावरही गेला होता.

अर्जुन तेंडुलकरने मुंबई राज्य संघाकडून आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. आता रणजी मोसमात अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करू शकतो, असे मानले जात आहे. मुंबई इंडियन्सने 2022 च्या मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरसह इतर अनेक खेळाडूंवर सट्टा लावला आहे.

मुंबई इंडियन्स

5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन संघाने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिलावात कोणत्याही एका खेळाडूवर 10 कोटींहून अधिक खर्च केले आहेत. IPL लिलावाच्या पहिल्या दिवशी इशान किशनला मुंबई इंडियन्स संघाने 15.25 कोटींना विकत घेतले.

मागच्या वर्षी ही घेतले होते बेस प्राईज मध्ये विकत.

मुंबई इंडियन्सने मागच्या वर्षी सुद्धा अर्जुनला त्याच्या बेस प्राईज मध्ये विकत घेतले होते. अर्जुनची त्यावर्षीची किंमत ही २० लाख होती. महत्वाच म्हणजे अर्जुन त्यावर्षी एकही सामना खेळू शकला नाही. आता यंदा तरी त्याला एखाद्या सामन्यात संधी मिळते का हे पाहणे रंजक ठरणार आहे..


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here