आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
आयपीएल 2022 मध्ये हे 5 स्टार खेळाडू मैदानात खेळतांना दिसणार नाहीत….
आयपीएल 2022 आता जवळ येऊन ठेपल आहे. दोन दिवसापूर्वीच झालेल्या मेगा लिलावात अनेक युवा खेळाडूंवर करोडोंची बोली लावली गेली. ईशान किशन असो की श्रेयस अय्यर यांना खरेदी करण्यासाठी संघांमध्ये अक्षरशा ओढाताण होतांना दिसून आली.
तर दुसऱ्या बाजूने अनेक दिग्गज खेळाडूंवर कोणी बोलीच लावली नाही. त्यात प्रामुख्याने डावखुरा फलंदाज सुरेश रैना, इंग्लंडचा कर्णधार इयोन मोर्गन यांचा समावेश आहे.
या दिग्गजांचे नाव जेव्हा लिलाव हॉलमध्ये घेतले गेले तेव्हा कोणत्याही संघाने यांना खरेदी करण्यास बोली लावली नही.

अनेक खेळाडूंना अपेक्षेपेक्षा जास्त पैसे देऊन विकत घेतले गेले, तर काही खेळाडू असे होते ज्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या पण त्यांना खरेदीदार सापडला नाही. यांसह अनेक दिग्गज खेळाडू असेही आहेत ज्यांनी या लिलावात भागच घेतला नही.
चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते खेळाडू जे यंदाच्या आयपीएलमध्ये मैदानावर खेळतांना दिसणार नाहीत..
सुरेश रैना : सुरेश रैना हा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाला यावेळी कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. रैनाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती परंतु कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही आणि तो विकला गेला नाही.
रैनाने आतापर्यंत सर्व आयपीएल सामने खेळले आहेत पण यावेळी तो आयपीएल खेळू शकणार नाही, बाकी पुढे काय होते ते पाहू. रैनाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 193 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 5368 धावा केल्या आहेत, रैनाच्या धावांमध्ये एक शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे.
मेगा लिलावात जरी कुणीही रेनावर बोली लावली नसली तरीही रैनाला जर खेळायचं असेलच तर तो एखाद्या संघाकडून कमी पैश्याच खेळण्याची ऑफर देऊ शकतो.
पण साहजिकच संघानेही त्याची ती ऑफर स्वीकारली तरच रैना संघासोबत दिसेल. परंतु अंतिम अकरा जणांमध्ये रैनाचा समावेश असण्याची शक्यता धूसरच आहे..
एबी डिव्हिलियर्स: जगातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक असलेला एबी डिव्हिलियर्स यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही. यावेळी आम्ही आयपीएलमध्ये ते 360 डिग्री शॉट्स पाहू शकणार नाही. डिव्हिलियर्सला क्रिकेटमधून सर्व फॉरमॅटला अलविदा केलंय.
त्यामुळे तो खेळू शकणार नाही. डिव्हिलियर्सने आतापर्यंत एकूण 184 आयपीएल सामने खेळले असून त्यात त्याने 5162 धावा केल्या आहेत. डिव्हिलियर्स पहिल्या सत्रापासूनच आयपीएलचा भाग आहे.
डिव्हिलियर्सला वाटल असत तर तो अंतरराष्ट्रीय स्तरातून निवृत्त झाल्यानंतर आयपीएल खेळू शकला असता. परंतु त्याने तसं न करता सर्वच प्रकारच्या खेळातून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे पहिल्या सत्रापासून आयपीएल खेळणाऱ्या या खेळाडूला यंदा मैदानात प्रेक्षकांना पाहता येणार नही..
पियुष चावला: या यादीत फिरकी गोलंदाज पियुष चावला तिसऱ्या क्रमांकावर आहे. पियुष चावला हा प्रसिद्ध गोलंदाज आहे. पियुष गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनॅशनलमध्ये दिसत नसला तरी आयपीएलमध्ये तो सतत दिसत होता.
हंगामात असे होणार नाही. पियुषला या मोसमासाठी कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. पियुष चावलाने आतापर्यंत एकूण 165 आयपीएल सामने खेळले असून त्यात त्याने 157 विकेट घेतल्या आहेत.
मेगा लिलावात कुणीही खरेदीदार न मिळाल्याने पियुष सुद्धा मैदानात दिसणार नाहीये.
इऑन मॉर्गन: आयपीएल 2022 च्या लिलावातइंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन विकला गेला नाही. त्याच्यावर बोली लावण्यात कोणत्याही फ्रँचायझींनी स्वारस्य दाखवले नाही.
या लिलावात इऑन मॉर्गनने आपली किंमत 1.5 कोटी ठेवली होती.. मॉर्गन गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता आणि संघाचा कर्णधारही होता.
डाव्या हाताच्या या फलंदाजाने आयपीएल 2010 मध्ये आपला पदार्पण हंगाम खेळला. या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग होता. त्या हंगामात 6 गेम खेळून त्याने 35 धावा केल्या. पुढच्या सत्रात त्याला संघातून वगळण्यात आले होते.
यंदा कोणत्याही संघाने खरेदी न केल्यामुळे हा स्टार खेळाडू सुद्धा मैदानात दिसणार नही..
ख्रिस गेल: वेस्ट इंडिजच्या स्फोटक फलंदाज ख्रिस गेल सुद्धा आयपीएल २०२२ च्या महा हंगामात खेळतांना दिसणार नाहीये. आयपीएल लिलावाच्या यादीत त्याने आपलं नाव नोंदवले नही. त्यामुळेच तो यंदा कोणत्याही संघाकडून खेळतांना दिसणार नाही.
गेलने आरसीबी, पंजाब यांसारख्या संघाकडून स्फोटक अश्या खेळ्या केल्या आहेत. स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या या फलंदाजाला सुद्धा चाहते या हंगामात मिस करतील..
=
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?
कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!