या कारणामुळे सुरेश रैनाला आयपीएल लिलावात कोणीतरी खरेदी करायला हवे होते…
दोन दिवसापूर्वीच आयपीएल 2022 साठी मेगा लिलाव संपन्न झाला. या लिलावात अनेक नवीन खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैसा उधळला गेले. परंतु चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज खेळाडू या लिलावात विकला गेला नही. यामुळे रैनाच्या चाहत्यांसह चेनईचे चाहते सुद्धा काहीसे नाराज झाले आहेत.
रेनावर चेन्नई तरी बोली लावेल असी आशा त्यांना होती मात्र प्रत्यक्षात तसे झाले नही.
याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी अनुभवी फलंदाज सुरेश रैना आयपीएल 2022 मेगा लिलावादरम्यान न विकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. आयपीएल लिलावात रैनावर बोली लागली असावी कारण तो खूप अनुभवी खेळाडू आहे, असे त्याने म्हटले आहे.

सुरेश रैना हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक मानला जातो आणि या खेळाडूने लीगमध्ये अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत आणि क्षेत्ररक्षणातही एक वेगळी पातळी निर्माण केली आहे.
रैनाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू आहे. त्याने 205 सामन्यांमध्ये 136.76 च्या स्ट्राइक रेटने 5528 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने एक शतक आणि 39 अर्धशतकं झळकावली.
2 कोटींच्या मूळ किमतीत सुरेश रैनाला कोणीही खरेदीदार मिळाला नाही.
आयपीएल लिलावात सुरेश रैनाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मात्र, कोणत्याही फ्रँचायझीने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. त्याचा जुना संघ चेन्नई सुपर किंग्सनेही त्याच्यासाठी बोली लावली नाही.
भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर यांनी रैनाला लिलावात खरेदीदार न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. याबद्दल बोलतांना गावस्कर म्हणाले की, मला सुरेश रैनाबद्दल आश्चर्य वाटले की त्याला कोणीही खरेदीदार सापडला नाही. तो डावखुरा फलंदाज आहे, ऑफ-स्पिन गोलंदाजी करू शकतो आणि खूप अनुभवी देखील आहे.
गेल्या मोसमात दुबईच्या खेळपट्ट्यांवर जिथे भरपूर उसळी आहे, तिथे तो थोडा घाबरलेला दिसला आणि त्यामुळेच भारतीय खेळपट्ट्यांवरही असेच घडेल असे सर्वांना वाटले असावे. मात्र ही भावना त्यांच्यात का आली हे सर्व संघच सांगू शकतील.
खर तर रैना सारख्या खेळाडूला खरेदीदार न मिळणे हे नक्कीच आच्छर्यकारक आहे. परंतु हे सर्व विसरून रैना पुढच्या वर्षी नक्की आयपीएलमध्ये प्रवेश करेल असा विश्वास गावस्कर यांनी बोलून दाखवला.
रैना संघात नसल्यामुळे आता चेन्नईचे चाहते ही त्याला मिस करतील हे मात्र नक्की…
=
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा :
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?
कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!