आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारतासाठी करो वा मरो परिस्थितील सामन्यात तीन गडी राखत न्यूझीलंडने केला पराभव


क्वीन्सटाऊनच्या (Queenstown) जॉन डेव्हिस ओव्हल (John Davies Oval) मैदानात न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळण्यात आलेल्या ५ सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडच्या संघानं ३-० विजय मिळवून मालिकेवर कब्जा केलाय. या मालिकेतील अखरेचे दोन सामने केवळ औपचारिकता म्हणून खेळले जातील.

भारताचं मालिका टिकवण्याचं आव्हान संपुष्टात

या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर भारतानं ४९.३ षटकात पूर्ण बाद २७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघानं ४९.१ षटकात ७ गडी गमावून भारतानं दिलेलं २८०धावांचं लक्ष्य पूर्ण केलं. पाच सामन्याच्या मालिकेत भारतानं सुरुवातीचे २ सामने गमावले होते. यामुळं तिसरा सामना जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं होतं. परंतु, न्यूझीलंडच्या संघानं तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताचं मालिका टिकवण्याचं आव्हान संपुष्टात आणलं.

एस मेघना, शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्माची अर्धशतकीय खेळी व्यर्थ

या सामन्यात एस मेघना, शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८० धावांचे मजबूत लक्ष्य ठेवलं. मेघना आणि शेफाली यांनी पहिल्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी केली. मेघनानं ४१ चेंडूंत ९ चौकार आणि २षटकारांच्या मदतीनं ६१ धावा केल्या, जे तिच्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे. तर, शेफालीनं ५७ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या.

शेफालीचं हे एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आहे. याशिवाय, दीप्तीनंही नाबाद ६१धावांची खेळी केली. ज्यात ७ चौकारांचा समावेश आहे. कर्णधार मिताली राजनं २३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून हॅना रोवे आणि रोझमेरी मायर यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर, सोफी डेव्हाईन अमेलिया केर, फ्रान्सिस मॅके आणि एमी सॅटरथवेट यांना प्रत्येकी १-१ बळी मिळवता आला.

भारताचा 3 विकेट्सनं पराभव

भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघानं १४ धावांतच त्यांचे २ गडी गमावले. मात्र, यानंतर एमी सॅटरथव्हेट (५९) आणि एमिला केर (६७) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १२७चेंडूत १०३ धावांची शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. केरनं ८० चेंडूंत ८ चौकार मारले. तर, सॅटरथव्हेटनं ७६ चेंडूंत ६ चौकार मारले.

त्याच्याशिवाय मॅडी ग्रीननं २४आणि लॉरेन डाऊननं नाबाद ६४धावा केल्या. डाऊननं ५२ चेंडूत ६चौकार आणि २ षटकार मारले. तर, केटी मार्टिननं ३७ चेंडूत ३५ धावा केल्या. अखेरच्या षटकात न्यूझीलंडच्या संघानं ३ राखून भारतावर विजय मिळवला.भारताकडून गोस्वामीनं सर्वाधिक ३ बळी घेतल्या. तर, रेणुका सिंह, एकता बिष्ट, दिप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी १-१ गडी बाद करता आला.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here