आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मालिका विजयाचे लक्ष्य ठेऊन वेस्ट इंडिज विरुद्ध उतरणार भारतीय संघ! संभाव्य अंतिम ११ खेळाडू, खेळपट्टी आणि हवामानाचा अंदाज फक्त एका क्लिकवर!


भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात आज तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हा सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं  पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-0 आघाडी घेतलीय.

दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून टी-20 मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल. तर, दुसऱ्या टी-20 मालिकेत विजय मिळवून 3 सामन्याच्या टी-20 मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ मैदानात उतरणार आहे.

कोलकात्याच्या ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल असते. या खेळपट्टीवर फलंदाजांना अधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे. भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना संध्याकाळी होणार आहे. यामुळं मैदानावर धुके असण्याची शक्यता आहे. यामुळं नाणेफेक जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.

शुक्रवारी येथे हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे पावसाची शक्यता नसल्यानं सामना पूर्ण खेळला जाईल. येथील तापमान कमाल 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. तर, 13 किलोमीटर प्रतितास हवा वाहण्याची शक्यात आहे.

भारताचा संभाव्य प्लेईंग संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर/दीपक हूडा, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, भुवनेशवर कुमार आणि आवेश खान.

वेस्ट इंडीजचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन संघ:

वेस्टइंडीज की संभावित प्लेइंग इलेवन- ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमॅन पॉवेल, कीरोन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, रोशटन चेज, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, शेल्डन कॉटरेल/डोमिनिक ड्रेक्स.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here