आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

लग्नाची पत्रिका व्हायरल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू झाला चिंतीत! अतिरिक्त सुरक्षेची केली मागणी


ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल पुढील महिन्यात प्रेयसी विनी रमण हिच्यासोबत लग्न करणार आहे आणि त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाल्यामुळे मॅक्सवेलच्या चिंतेत भर पडली आहे. त्याने आता सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागेल, असे मत व्यक्त केले.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ग्लेन व विनी यांची तमिळ भाषेत छापली गेलेली लग्न पत्रिका व्हायरल झाली. ग्लेन व विनी फक्त ३५० पाहुण्यांच्या साक्षीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात जवळचे मित्र व नातेवाईक असतील. पण, आता त्याची पत्रिकाच व्हायरल झाल्याने ज्यांना तमिळ येते तेही लग्नाला पोहोचण्याची भीती ग्लेनला वाटू लागली आहे.

ग्लेन म्हणाला, भारतातील नातेवाईक खूपच आनंदी झाले आणि त्यांनी लग्नपत्रिका आणखी काही जणांना पाठवली आणि आता ती इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. त्यामुळे आता सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि आता मेलबर्नमध्ये होणाऱ्या या लग्नासाठी अतिरिक्त सुरक्षा मागवावी लागणार आहे.

”आम्ही जसे ठरवले होते, तसे होताना दिसत नाही. आता आम्हाला अतिरिक्त सुरक्षा मागवावी लागणार आहे. हा खाजगी सोहळा असणे अपेक्षित होते आणि दुर्दैवाने भारतातील काही नातेवाईक फारच उत्साहित झाले आणि त्यांनी त्यांच्या मित्रांना पत्रिका पाठवली.

पुढच्याच मिनिटाला ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता,”असे ग्लेन मॅक्सवेलने www.cricket.com.au ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. २७ मार्चला ३३ वर्षीय ग्लेन तमिळ पद्धतीत लग्न करणार आहे. लग्नामुळे ग्लेन आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here