आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मालिका अर्ध्यावर सोडून विराट कोहली घरी परतला, बीसीसीआय ने ऋषभ पंतला दिला आराम


विराट कोहली भारतीय क्रिकेट संघापासून वेगळा झाला आहे. त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. तो त्याच्या घरी गेला आहे. जैवसुरक्षामुळे बीसीसीआयने विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. कोहलीला १० दिवसांची विश्रांती देण्यात आल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. यापूर्वी असे वृत्त होते की, भारतीय संघाचा माजी कर्णधार २४ फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा भाग असणार नाही. ही मालिका लखनौमध्ये सुरू होणार आहे. यानंतर उर्वरित दोन सामने २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी धर्मशाला येथे होणार आहेत.

पीटीआयने बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, होय, कोहली शनिवारी सकाळी त्याच्या घरी गेला. भारताने याआधीच मालिका जिंकली आहे. बीसीसीआयने निर्णय घेतला होता की सर्व प्रकारच्या क्रिकेट मध्ये खेळणाऱ्या सर्व नियमित खेळाडूंना वेळोवेळी जैवसुरक्षा मधून आराम दिला जाईल आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप निवड झालेली नाही. १९ फेब्रुवारीला रात्री संघाची घोषणा होऊ शकते, असे म्हटले जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेअंतर्गत दोन सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने मोहाली आणि बंगळुरू येथे होणार आहेत. विराट कोहली कसोटी मालिकेत खेळणार आहे.

तसेच, ऋषभ पंत मागच्या काही काळापासून सातत्याने भारतीय संघाकडून क्रिकेट खेळतोय. त्यामुळे त्यालाही वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यासाठी युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला आराम देण्यात आला आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेमध्येही ऋषभ पंत खेळणार नाहीय. BCCI ने ऋषभ पंतला आगामी कसोटी मालिका लक्षात घेऊन आराम दिला आहे.

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये तो भारताचे प्रतिनिधीत्व करतोय. पुढच त्याचं वेळापत्रकही व्यस्त आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर IPL चा हंगाम सुरु होतोय. त्यात ऋषभ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. तो दिल्लीचा कर्णधार आहे. हेच व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन त्याला आराम देण्यात आला आहे. कालचा सामना ८धावांनी जिंकून भारताला वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना आता फक्त औपचारीकता मात्र आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत इशान किशन यष्टीरक्षकाची जबाबदारी संभाळेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here