आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

2021 मध्ये हे 5 चित्रपट गुगलवर सर्वांत जास्त सर्च केले गेले, जयभीम चा आहे हा नंबर…


 

2021 संपून सध्या दोन महिने होत आले आहेत.  या वर्षातील अनेक गोड कडूआठवणी मागे ठेवून आपण 2022 मध्ये प्रवेश केलाय. या काळात कोरोनाने लोकांना 2 वर्षांपासून घरी बसण्यास भाग पाडले आहे, अशा परिस्थितीत बॉलीवूड चित्रपट आणि वेब सीरीज लोकांच्या मनोरंजनाचे मुख्य साधन बनले. यादरम्यान आपल्याला अनेक उत्कृष्ट चित्रपट पाहायला मिळाले, या प्रदर्शित चित्रपटाना प्रेक्षकांनीही पसंती दिली. दरम्यान, गुगलने 2021 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या बॉलीवूड चित्रपटांची यादी प्रसिद्ध केलीय. या यादीत गुगलवर सर्च केले गेलेले 5 चित्रपट कोणते याची माहिती दिलीय.

चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते चित्रपट..

 

जय भीम: साऊथचा सुपरस्टार सुर्याचा चित्रपट ‘जय भीम’ यावर्षी भारतात ‘गुगल टॉप सर्च’मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका वकिलाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्याच्या उत्तम कथेमुळे, चाहत्यांनी त्याला गुगलवर सर्वात अधिकवेळा शोधले.

 शेरशाह: सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी अभिनीत चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्याच्या कथेवर आधारित आहे, ज्यांना  भारत-पाक युद्धातील नायक परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. त्यामुळेच ‘गुगल टॉप सर्च’ यादीत ‘शेरशाह’ दुसऱ्या क्रमांकावर होता.

चित्रपट

 राधे: या वर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेला हा तिसरा चित्रपट ठरला. बॉलीवूड स्टार सलमान खानचा चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’चाही ‘गुगल 2021 टॉप सर्च मूव्ही’मध्ये समावेश आहे. पण OTT वर प्रदर्शित झालेला भाईजानचा हा चित्रपट फ्लॉप ठरला.

  बेलबॉटम: अक्षय कुमार अभिनीत ‘बेल बॉटम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी OTT वर हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. यावर्षी गुगलवर सर्च केल्यास हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर होता.

सूर्यवंशी: या यादीत अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे.’सूर्यवंशी’ हा रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट गेल्या 2 वर्षात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘सूर्यवंशी’ने आतापर्यंत जवळपास 200 कोटींची कमाई केली आहे.

तर रसिकांनो हेच ते भारतीय चित्रपट आहेत ज्यानी चित्रपटसृष्टि तर गाजवलीच परंतु गूगलवर देखिल सर्वात जास्त सर्च केली आहेत.


=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here