आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पाहा असे नक्की काय झाले की शतकवीर यश धुल ९७ धावांवर बाद झाल्यानंतर देखील त्याला, पुन्हा फलंदाजीला बोलवले


गेल्याच महिन्यात वेस्ट इंडिज येथे झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताला विक्रमी पाचवे विजेतेपद मिळून देणारा कर्णधार यश धुल याने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात कमालच केली. कोणत्याही क्रिकेटपटूला हवी अशी वाटणारी सुरुवात यशने केली. त्याने तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच दिवशी शतक झळकावले.देशात आजपासून सुरु झालेल्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी या खास विक्रमाची नोंद झाली.

फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली संघाची अवस्था २ बाद ७ अशी झाली होती. तामिळनाडूचा संघ सामन्यावर पकड मजबूत करेल असे वाटले असताना यशने त्यांना धक्का दिला. यशने नितीष राणासोबत तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागिदारी केली. राणा बाद झाल्यांतर त्याने चौथ्या विकेटसाठी जोंटी सिद्धूसह शतकी भागिदारी केली. यशने दिल्लीला फक्त अडचणीतून बाहेर काढले नाही तर सुस्थितीत देखील नेले.

शतकाच्या जवळ पोहोचल्यावर यशला एक जीवनदान मिळाले. यश ९७ धावांवर खेळत असताना तामिळनाडूचा जलद गोलंदाज एम मोहम्मद गोलंदाजी करत होता. त्याने ४४ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर यशने पुल शॉर्ट मारला आणि चेंडू थेट फिल्डरच्या हातात गेला.

शतकाच्या इतक्या जवळ आल्यानंतर विकेट गमावल्याने यश थोडा नाराज झाला होता. पण त्याने क्रिझ सोडली नव्हती. कारण मैदानावरील अंपायर्सना नो बॉल आहे का हे चेक करायचे होते. तिसऱ्या अंपायरनी रिप्लेमध्ये पाहिले तेव्हा एम मोहम्मदचा पाय लाईनच्या पुढे पडला होता. त्यामुळे नो बॉल देण्यात आला. ९७ धावांवर मिळालेले जीवनदान यशने वाय जाऊ दिले नाही. त्याने १३३ चेंडूत शतक केले. यशने १५० चेंडूत १८ चौकारांसह ११३ धावा केल्या.

रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक करण्याची अनोखी कामगिरी यशच्या नावावर जमा झाली आहे. भारतीय फलंदाजांमध्ये अशी कामगिरी याआधी सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंनी केली आहे.

पहिल्या रणजी सामन्यात यशने दिल्ली संघाला बिकट परिस्थितीतून बाहेर काढले. तामिळनाडूचा जलद गोलंदाज संदीप वॉरियरने दिल्लीला बॅकफुटवर ढकलले होते. ध्रुव शौरी आणि हिम्मत सिंहला बाद करून दिल्लीची अवस्था ३ षटकात २ बाद ७ अशी केली होती. त्यानंतर आलेल्या यशने नितीष राणासोबत तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागिदारी केली. राणा बाद झाल्यांतर त्याने चौथ्या विकेटसाठी जोंटी सिद्धूसह शतकी भागिदारी केली.

यशने त्याच्या डावात १८ चौकार मारले. यशने त्याचा हा फॉर्म कायम ठेवला तर दिल्ली संघासाठी फायद्याचे ठरले. या वर्षी रणजी ट्रॉफी दोन टप्प्यात खेळवली जाणार आहे. पहिला टप्पा १५ मार्चपर्यंत असेल आणि नॉक आउट लढती नंतर खेळल्या जातील. रणजीनंतर यश आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. लिलावात त्याला ५० लाख रुपयांना खरेदी करण्यात आले होते. त्याच्यासाठी पंजाब किंग्जने देखील बोली लावली होती.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here