आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

IPL 2022 मोठ्या लिलावात या खेळाडूवर लावलेल्या बोलीत ‘घोळ’ झाला; काव्या मारन ला २५ लाखांचा फटका बसला


IPL 2022 च्या पर्वासाठी झालेल्या ऑक्शनमध्ये २०४ खेळाडूंसाठी जवळपास ५५१ कोटींची बोली लावली गेली. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी ऑक्शनर ह्युज एडमंड्स हे चक्कर येऊन पडले अन् आयत्यावेळी चारू शर्मा यांना बोलावण्यात आले. चारू शर्मांनी कोणताच गृहपाठ केलेला नसतानाही ऑक्शनरची जबाबदारी योग्य रितीने पार पाडली. परंतु त्यांच्याकडून झालेल्या मोठ्या घोळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आय पी एल २०२२ मोठ्या लिलावामध्ये चारू शर्मा यांनी भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याच्यावरील बोलीत घोळ केला आणि तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या या एका चूकीमुळे काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला २५ लाखांचा फटका बसला. वॉशिंग्टन सुंदरवर ६.५० कोटींची बोली सुरू असताना गुजरात टायटन्सने ६.७५ कोटींची बोली लावली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने ७ कोटींची बोली लावली. त्यानंतर चारु शर्माला ७.२५ अशी पुढील बोली म्हणायची होती, परंतु त्यांनी ७. ५० कोटीची मागणी केली. चारू शर्मा यांनी थेट वॉशिंग्टनची किंमत ५० लाखांनी वाढवली. त्यांची ही चूक कोणाच्याच लक्षात आली नाही आणि बोली पुढे सुरूच राहिली.

वॉशिंग्टनची बोली ८.७५ कोटींवर गेल्यानंतर गुजरातने माघार घेतली आणि सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात अष्टपैलू खेळाडू दाखल झाला. पण, चारू शर्मांच्या चुकीमुळे सनरायझर्स हैदराबादला २५ लाख अतिरिक्त भरावे लागले. खलिल अहमद याच्याबाबतीतही अशीच चूक झाली. मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी ५.२५ कोटींची बोली लावली होती, परंतु चारूने त्याला दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात पाठवले.

एकूण दहा संघांचा समावेश असलेल्या यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात २७ मार्चपासून होण्याची शक्यता आहे. तसेच २८ मे ला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविला जाऊ शकतो. हाती आलेल्या काही अहवालांनुसार मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या चार शहरांत संपूर्ण आयपीएलचे सामने खेळविले जातील.

तसेच मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील एकूण सहा मैदानांवर आयपीएलच्या साखळी फेरीतील सामने पार पडतील, तर प्लेऑफसह अंतिम सामना अहमदाबादच्या स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई आणि नवी मुंबईतील सामने वानखेडे, ब्रेबॉर्न, डॉ. डी. वाय. पाटील आणि रिलायन्स जियो या स्टेडियमवर खेळविले जाऊ शकतात.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here