आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

याआधी भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत किती वेळा आणि किती काळ अव्वल राहिला होता, वाचा


ICC T20 Team Rankings: टीम इंडिया आधी कधी अन् किती काळ टॉपर होती?

वेस्ट इंडीज संघाला घरच्या मैदानात ३-० असे निर्भेळ यश (क्लीन स्वीप) देत भारतीय संघाने नुसती मालिका जिंकलेली नाही. या विजयासह टी-२० क्रिकेटमध्ये नंबर वनचा ताज देखील मिळवलाय. आयसीसीने सोमवारी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारी जारी केली. कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानातील दिमाखदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने क्रमवारीत अव्वलस्थान मिळवले आहे. इंग्लंडला मागे टाकत ते पहिल्या स्थानावर विराजमान झाले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि इंग्लंड दोन्ही संघ २६९ रेटिंगसह बरोबरीत आहेत. पण भारतीय संघाच्या खात्यात १०,४८४ गुण जमा आहेत. याउलट इंग्लंड (१०४७४) १० गुणांनी मागे पडले. आयसीसीच्या क्रमवारीत पाकिस्तान (रेटिंग २६६), न्यूझीलंड (२५५) आणि दक्षिण आफ्रिका (२५३) अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंकेला ४-१ अशी मात देणारा विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

सहा वर्षानंतर मिळाला ताज

मागील सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर टीम इंडिया टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी पोहचला आहे. याआधी धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अव्वलस्थान पटकावले होते. १२ फेब्रुवारी २०१६ ते ३ मे २०१६ या तीन महिन्यांच्या कालावधीत टीम इंडिया अव्वलस्थानी राहिली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हे स्थान किती काळ कायम ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

रोहितची विराट विक्रमाशी बरोबरी

टी-२० विश्वचषकानंतर स्पर्धेनंतर भारतीय टी-२० संघात नेतृत्व बदल झाला. विराट कोहलीने वर्ल्ड कप आधीच संघाची धूरा सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याने कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदाही रोहित शर्माच्या खांद्यावर आली. रोहित शर्माने न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनं पूर्णवेळ कर्णधारपदाचा भार सांभाळला. रोहित शर्माने टी-२० मध्ये संघाचे नेतृत्व करताना सलग नववा विजय मिळवला. या कामगिरीसह त्याने विराटच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here