आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

न घर का न घाट का… संघामधील या खेळाडूंची झालीय ही अवस्था की त्यांच्यावर बीसीसीआय कडे विनवणी करण्याची वेळ आलीय!


यंदाच्या आयपीएलमधून अनेक दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली. तर काही खेळाडूंना खेळण्याची संधीच मिळाली नाही. मेगा ऑक्शन 2022 मध्ये असा एक खेळाडू आहे जो शेवटपर्यंत अनसोल्ड राहिला. त्याला कोणत्याच संघाने घेतलं नाही. त्यानंतर या क्रिकेटपटूनं बीसीसीआय कडे कुठेतरी खेळण्याची संधी द्या अशी विनवणी केली आहे.

10 टीमपैकी एकाही टीमने या क्रिकेटपटूवर बोली लावली नाही. अगदी अजिंक्य रहाणेवरही बोली लागली मात्र या खेळाडूचे हात सुकेच राहिले. आयपीएलमध्ये धोनीच्या संघातून खेळणारा हा खेळाडू आता एकटा पडला आहे. धोनीचा खास मित्र सुरेश रैनाला मेगा ऑक्शनमध्ये कोणीच संधी दिली नाही.

मेगा ऑक्शन 2022 मध्ये सुरेश रैनाला 10 पैकी एकाही संघाने भाव दिला नाही. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. पहिल्यांदाच सुरेश रैना ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला आहे. सीएसके नेही त्याच्यावर बोली लावली नाही.

2008 पासून सुरेश रैना चेन्नई संघाशी जोडला होता. मात्र यंदा सीएसके ने रैनाची साथ सोडली. त्यानंतर रैनाला कोणीच आपल्या संघात घेतलं नाही. 205 सामन्यात केवळ 5528 धावा करण्यात यश आलं आहे. रैनाच्या पुढे विराट, शिखर धवन, रोहित शर्मा तीन धडाकेबाज फलंदाज आहेत.

रैनाने बीसीसीआयला कळकळीची विनंती केली आहे. आयपीएलमध्ये 10 पैकी एकाही संघाने माझ्यावर बोली लावली नाही. आता कमीत कमी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाहेरच्या लीगमध्ये खेळण्याची परवानगी बीसीसीआय ने द्यावी अशी विनंती केली आहे. सुरैश रैनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सीपीएल, बीबीएल सारख्या लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी असं रैनाचं म्हणणं आहे. आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना इतर लीगमध्ये सहभागी होता येत नाही. त्यामुळे आता रैनाच्या ह्या विनंतीवर बीसीसीआय खरंच विनंती करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here