आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
गंगुबाई काठीयावाडी चित्रपटात आलीया भट्ट सोबत रोमान्स करतांना दिसणारा मुलगा कोण आहे? चित्रपटात आहे महत्वाची भूमिका..
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या येणाऱ्या चित्रपट गंगुबाई काठीयावडी मुळे चर्चेत आहे. सध्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला बॉलिवूड जगतात सध्या तिची स्तुती होत आहे. त्याचसोबत तिची एक व्यक्तीरेखा सुध्दा आहे ज्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले आहे.
आगामी चित्रपट गंगुबाई कथियावाडी मधील एक गाणं प्रदर्शित झाला आहे त्या मध्ये आलिया आणि शांतनू महेश्वरी याच्यातील रोमान्स दाखवला आहे दोघे पत्ते खेळत तांगा चालवतात दोघांची केमिस्ट्री लोकांना फारच आवडते आहे तर जाणून घेऊया आलिया सोबत प्रेम करणारा शांतनू महेश्वरी आहे तरी कोण?

डान्सर आणि कोरिओग्राफअर आहे शांतनू महेश्वरी
शांतनू महेश्वरी चा हा पहिलाच चित्रपट आहे. या आधी त्याने अनेक शोर्ट चित्रपटात काम केले आहे. तो प्रसिद्ध टीव्ही शो ‘दिल दोस्ती डांस’ यासाठी ओळखला जातो. याच शोपासून त्याने आपल्या अभिनय करिअरची सुरवात केली होती. टीव्ही शो व्यतिरिक्त तो अनेक रियालिटी शो मध्ये सुध्दा दिसला होता.. प्रसिद्ध शो खतरो के खिलाडी मध्ये सुद्धा त्याने काम केले आहे आणि तो या शोच्या एका हंगामाचा विजेता सुद्धा झाला होता.
सोशल मिडीयावर सुद्धा त्याचे करोडो चाहते आहेत. गंगुबाई काठियावाडीच्या निमित्ताने तो आता मोठ्या पडद्यावर आपलं पाउल ठेवत आहे..
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
नवीन अपडेट अवश्य बघा : निळ्या रंगाचा लावा ओकणारा ज्वालामुखी!