आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या 5 गोलंदाजांनी आयपीएल मध्ये केलंय संघाच नेतृत्व, परंतु ठरले सगळेच फेल…


सामान्यतः क्रिकेटच्या खेळात फलंदाजाची संघाचा कर्णधार म्हणून निवड केली जाते. संघाची जबाबदारी गोलंदाजावर सोपवली जाते, असे फार क्वचितच पाहायला मिळते. मात्र, आयपीएलमध्ये असे अनेकदा घडले आहे, जेव्हा गोलंदाजाला संघाचा कर्णधार म्हणून पाहिले जात होते. आयपीएल फ्रँचायझीचे नेतृत्व करणारे पाच भारतीय गोलंदाज आहेत. पण यश कोणालाच मिळाले नाही. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते गोलंदाज..

 हरभजन सिंग: हरभजन सिंगने आयपीएलमधील 20 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. पण त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला केवळ 10 सामने जिंकता आले आणि 10 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले.

अनिल कुंबळे:अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेला 2009 आणि 2010 च्या आयपीएलमध्ये कर्णधारपदाची संधी मिळाली, त्याने 26 सामन्यांमध्ये आरसीबीचे नेतृत्व केले. पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 15 सामने जिंकले आणि 11 सामने गमावले.

गोलंदाज

झहीर खान:झहीर खानने 2016 आणि 2017 IPL दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे 23 सामन्यांत नेतृत्व केले. झहीर खान गोलंदाज म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरला. मात्र तो आपल्या संघाला केवळ 10 सामन्यांत विजय मिळवून देऊ शकला आणि 13 सामन्यांत त्याच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

भुवनेश्वर कुमार:भुवनेश्वर कुमारने 2019 IPL दरम्यान 6 सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केले. पण तो आपल्या संघासाठी केवळ दोनच सामने जिंकू शकला आणि चार सामने गमावला.

रविचंद्रन अश्विन: रविचंद्रन अश्विनने IPL 2018 आणि 2019 मध्ये पंजाब किंग्जचे 28 सामन्यांत नेतृत्व केले. पण कर्णधार म्हणून तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने आपल्या संघाला 12 सामन्यांत विजय मिळवून दिला तर 16 सामन्यांत पराभव पत्करावा लागला.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here