आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सभ्य माणसांच्या खेळात असभ्यवर्तन; हॅरिस रौफने कर्णधारासमोरच कामरानला मारली कानाखाली; पाहा VIDEO


क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे, हे म्हटले जाते. पण, या खेळात असभ्य वर्तन पाकिस्तान सुपर लीगमध्ये झालेले पाहायला मिळाले. सामन्यात लाहोर कंदर्स व पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ याने सहकारी कामरान घुलाम याच्या कानखाली लगावली. लाहोर कलंदर्स व पेशावर जाल्मी यांच्यातल्या सामन्यात हा प्रसंग घडला. पेशावर संघाने सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवला.

घुलाम याने पेशावरच्या हझरतुल्लाह जझाई याचा झेल सोडला, हॅरिस रौफ गोलंदाजीला होता. त्याच षटकात फवाद अहमदने सुरेख झेल घेत मोहम्मद हॅरिसला माघारी पाठवले. सर्व सहकारी या विकेटचा आनंद हॅरिस रौफसह साजरा करत असताना घुलामही गोलंदाजाजवळा आला. त्यानंतर संतापलेल्या रौफने त्याच्या कानाखाली लागवली.

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) च्या चालू हंगामात, सोमवारी पेशावर झाल्मी आणि लाहोर कलंदर यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यादरम्यान लाहोर कलंदरचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने विकेट घेतल्यानंतर त्याचा सहकारी कामरान गुलामला खानाखाली मारली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यासाठी क्रिकेट चाहते हॅरिस रौफवर टीका करत आहेत.

पेशावर झल्मीच्या डावाच्या दुसऱ्या षटकात ही घटना घडली. हॅरिस रौफ गोलंदाजी करत होता. त्याच्या एका चेंडूवर कामरान गुलामने पेशावर झल्मीचा सलामीवीर हजरतुल्ला जझाईचा झेल सोडला. रौफ हे पाहून खूप संतापला. तेव्हा त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्याच षटकात रौफने मोहम्मद हॅरिसला बाद केले आणि सर्व खेळाडू आनंद साजरा करण्यासाठी त्याच्याकडे आले. तेव्हा रौफने कामरान गुलामला कानाखाली मारली. मोहम्मद हॅरिस सहा धावा करून रौफच्या चेंडूवर फवाद अहमदकडे झेल देऊन बाद झाला. कामरानने पेशावर झल्मीचा सलामीवीर हजरतुल्ला झाझाईचा झेल सोडला होता, जो नंतर १६ चेंडूत २० धावा करून मोहम्मद हाफिजचा बळी ठरला.

हॅरिसच्या या कृतीने सहकारी खेळाडूंना धक्काच बसला, पण कामरान गुलामने ते अगदी सहजतेने घेतले. कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याने हसत हसत हॅरिसला ढकलले. यानंतर बाकीचे खेळाडूही हसायला लागले. हॅरिसच्या चेहऱ्यावरही हलके हसू आले. त्यानंतरही घुलाम हसत होता आणि रौफ त्याच्याकडे रागाने पाहत होता. १७व्या षटकात घुलामने क्षेत्ररक्षणात चपळता दाखवताना पेशावरचा कर्णधार वाहब रियाझला रन आऊट केले. तेव्हा रौफ त्याच्या जवण आला आणि घुलामला मिठी मारली.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here