आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारताने सामना गमावला पण स्मृतीच्या झेलने सर्वांचे मन जिंकले, हा अफलातून झेल एकदा पाहाच


भारताचा महिला संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. संपूर्ण मालिकेत भारतीय संघाने स्मृतीची कमतरता जाणवली होती. दोन्ही संघात झालेल्या चौथ्या एकदिवसीय मध्ये भारताचा पराभव झाला. ही लढत भारताने ६३ धावांनी गमावली. भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी चौथ्या लढतीसाठी संघात परतलेल्या स्मृती मानधनाने कमाल केली.

स्मृतीने संघात येताच तिने कमाल केली. या सामन्याआधी भारतीय संघाने मालिका गमावली होती. खराब फॉर्ममध्ये असलेल्या हरमनप्रती कौरला अंतिम ११ मधून वगळण्यात आले. या सामन्यात स्मृतीने घेतलेल्या झेलची संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चा आहे.

न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइनचा झेल स्मृतीने पकडला. भारताची गोलंदाज रेणुका सिंहच्या चेंडूवर सोफीने ऑफ साइडला जोरदार फटका मारला. पण ३० मीटरच्या आत उभी असलेल्या स्मृतीने हवेत उडी मारून झेल घेतला आणि सर्वांना धक्का दिला.

या सामन्यात सोफीला २४ चेंडूत ३२ धावा करता आल्या. पावसामुळे ही लढत ५० षटकांच्या ऐवजी प्रत्येकी २० षटकांची झाली. न्यूझीलंडने ५ गड्यांच्या बदल्यात १९१ धावांचा डोंगर उभा केला. अमेलिया केरने ३३ चेंडूत नाबाद ६८ धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने ३३ धावात चार चार गमावल्या.

न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय महिला संघाचा हा सलग पाचवा पराभव ठरलाय. याआधी भारताचा एक टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यात पराभव झाला होता.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here