आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम
===
या 5 खेळाडूंनी अंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वाधिक चौकार ठोकलेत.
भारतीय संघाने 1932 मध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. पण पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 20 वर्षे लागली. आतापर्यंत भारतीय संघाने कसोटीत 550 हून अधिक सामने खेळले आहेत, ज्यात 150 हून अधिक सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघात आतापर्यंत किती महान खेळाडू खेळले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा भारतीय क्रिकेटपटूंबद्दल सांगत आहोत ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारले आहेत.
सचिन तेंडुलकर: या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 329 डावात 15921 धावा केल्या. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कसोटीत 2058 चौकार मारले.

राहुल द्रविड: या यादीत राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत राहुल द्रविडने 163 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 284 डावात 13265 धावा केल्या. त्याने कसोटीत एकूण 1652 चौकार मारले.
वीरेंद्र सेहवाग: या यादीत वीरेंद्र सेहवाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. सेहवागने आपल्या कारकिर्दीत 103 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 1219 चौकार मारले आणि 8503 धावा केल्या.
व्हीव्हीएस लक्ष्मण: या यादीत माजी भारतीय क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत 124 कसोटी सामन्यांमध्ये 1135 चौकार आणि 8781 धावा केल्या आहेत.
सुनील गावस्कर:या यादीत सुनील गावसकर पाचव्या क्रमांकावर आहेत, त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 125 सामन्यांत 1016 चौकार आणि 10122 धावा केल्या आहेत.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
नवीन अपडेट अवश्य बघा : निळ्या रंगाचा लावा ओकणारा ज्वालामुखी!