आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

क्रिकेटच्या इतिहासातील हा कसोटी सामना केवळ 5 तासात संपला होता..


क्रिकेटमध्ये एकदिवसीय स्वरूपाचा खेळ 1 दिवसांचा असतो तर कसोटी सामना 5 दिवसांचा असतो. तोच T20 सामना काही तासांत संपतो. पण क्रिकेट इतिहासात असाही एक सामना झाला जो केवळ 5 तासात संपला होता. होय असा सामनाही झालेला आहे. अवघ्या ५ तासात संपलेल्या मॅचबद्दल तुम्हाला माहिती आहे का? शिवाय  या कसोटी सामन्यात गोलंदाजाने एक खास विक्रम करून इतिहास रचला होता.

फेब्रुवारी 1932 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फक्त 5 तास 32 मिनिटांचा सामना खेळला गेला. या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा कर्णधार जॉक कॅमेरूनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्यासाठी खूप वाईट ठरला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत असे घडले ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हते आणि हा कसोटी सामना संपल्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ फार काळ या धक्क्यातून सावरू शकला नाही.

कसोटी

या सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ 36 धावा करून गारद झाला होता. या सामन्यात केवळ कर्णधार कॅमेरूनने सर्वाधिक 11 धावांची खेळी खेळली. संघाच्या इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज बर्ट आयर्नमोंगरने 6 धावांत 5 बळी घेतले. त्याच्याशिवाय लॉरी नॅशने 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात 153 धावा केल्या. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ काही विशेष दाखवू शकला नाही आणि 35 धावांवर बाद झाला. यावेळी दक्षिण आफ्रिका संघाचे 5 फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या डावातही बर्ट आयर्नमोंगर ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाजीत हिरो ठरला. त्याने 15.3 षटकात 18 धावा देत 6 बळी घेतले.

या सामन्यात बर्ट आयर्नमोंगरने 24 धावांत 11 बळी घेत इतिहास रचला. हा सामना 4 दिवस चालला असला तरी 1 दिवस विश्रांती घेतली होती आणि उर्वरित 3 दिवस पावसामुळे खेळावर परिणाम झाला होता. हा सामना एकूण 5 तास 53 मिनिटे रंगला.


=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानवर आलेला टीम इंडियाचा हा 12वा खेळाडू नक्की कोण आहे?

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here