आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने चक्क महत्त्वाच्या पाच खेळाडूंना संघाबाहेर का ठेवले, पाहा…


आयपीएलसाठी याआधी एका प्रशिक्षक आणि खेळाडूने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ठेंगा दाखवला आहे. डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मॅथ्यू वॅड या पाच अनुभवी खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पण या पाच जणांना संघात स्थान का देण्यात आलेले नाही, याचे कारणही आता समोर आले आहे.

ऑस्ट्रेलियाने पाच खेळाडूंना संघाबाहेर का ठेवले, पाहा…

ऑस्ट्रेलियाच्या संघातील पाच अनुभवी खेळाडू बाहेर राहण्याची ही पहिलीच वेळ असेल. ऑस्ट्रेलियाने वनडे आणि टी-२० संघात पॅट कमिंन्स, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि जोश हेजलवुडसह अनेक मोठ्या खेळाडूंना संघाबाहेर ठेवले आहे. टी-२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य फेरीमध्ये विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या मॅथ्यू वेड आणि मिशेल स्टार्क यांना देखील पाकिस्तान दौऱ्यातील संघात घेतले नाही.

अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखालील या संघात जोश इंगलिस, बेन मॅक्डरमॉट, नाथन एलिस यांना संधी दिली आहे. आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स संघाने लिलावाच्या आधी संघात घेतलेल्या मार्कस स्टॉयनिसला मात्र संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघात ३ कसोटी, ३ एकदिवसीय आणि १ टी-२० लढत होणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघाच्या या दौऱ्याची खास गोष्ट म्हणजे ते तब्बल २४ वर्षांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास जात आहे. कसोटी मालिकेसाठी आधीच संघाची घोषणा करण्यात आली होती. आता २९ मार्चपासून सुरू होणार्या वनडे आणि ५ एप्रिल रोजी होणाऱ्या टी-२० सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा झाली आहे. मॅक्सवेचले लग्न असल्यामुळे तो या दौऱ्यावर जाणार नसल्यचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. पण अन्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाचे महत्वाचे खेळाडू मोठ्या स्पर्धांसाठी फिट असावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजत आहे. काही ज्णांच्यामते पाकिस्तानच्या दौऱ्यानंतर लगेचच आयपीएल खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी विश्रांती देण्याची मागणी केली असावी. त्यामुळे आयपीएलसाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्याला बुट्टी मारल्याचेही म्हटले जात आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here