आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

११ वर्षाच्या आजाराने ग्रासलेल्या वरदसाठी हा क्रिकेटपटू बनला देवदूत!


भारतीय क्रिकेटपटू विविध कारणांमुळे चर्चेत असतात. करोना काळात दिलेले योगदान असो वा इतर संस्थांना दिलेली देणगी असो, क्रिकेटपटू नेहमी आपल्याकडील संपत्तीचा उपयोग अनेकांच्या मदतीसाठी करत असल्याचे आपण पाहिले आहे. आता असेच एक उदाहरण केएल राहुलच्या रुपात समोर आले आहे.

मुंबईतील ११ वर्षीय नवोदित क्रिकेटपटू वरदला रक्ताच्या अज्ञात आजाराने ग्रासले होते. ज्यांना डॉक्टरांनी तात्काळ बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी (बीएमटी) करण्याचा सल्ला दिला होता. उपचारासाठी ३५ लाख रुपये खर्च आला. अशा परिस्थितीत केएल राहुल सप्टेंबर वरदसाठी देवदूत बनून आला, त्याने ३१ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

वरद नलावडेचे वडील सचिन हे विमा एजंट आहेत. भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचे वरद स्वप्न पाहतो आहे. वरदची आई गृहिणी आहे. दोघांनीही आपल्या मुलाच्या उपचारासाठी निधी उभारणी मोहीम सुरू केली. त्यांना चार लाख रुपये ऑनलाइन मिळाले होते. बाकीचे काम राहुलने केले. याविषयी केएल सांगतो, ”जेव्हा मला वरदच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळाली, तेव्हा माझ्या टीमने गिव्हइंडियाशी संपर्क साधला जेणेकरून आम्ही त्याला कोणत्याही प्रकारे मदत करू शकू. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा मला आनंद आहे.”

प्लास्टिक अॅनिमिया हा एक दुर्मिळ आजार आहे, जो रक्तामध्ये होतो. वरदमध्ये प्लेटलेट्स खूप कमी होत्या, ज्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती कमी झाली होती. सामान्य तापही बरा व्हायला काही महिने लागले. वरदला वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया हाच एक इलाज होता. वरदच्या आईने हात जोडून राहुलचे आभार मानले. “वरदच्या शस्त्रक्रियेसाठी एवढी मोठी रक्कम देणाऱ्या केएल राहुलचे आम्ही आभारी आहोत, पण इतक्या कमी वेळात बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे त्याच्यासाठी अशक्य होते. धन्यवाद राहुल”, असे वरदच्या आईने म्हटले.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here