आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

रोहितची पत्नी रितिकाकडून शाळा‘!, मला कॉल बॅक करशील का?


वेस्ट इंडिजच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा सामना करण्यासाठी लखनौ येथे दाखल झाली आहे. गुरुवारपासून भारत-श्रीलंका टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे आणि तीन सामन्यांची मालिका अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघाने मंगळवारी कसून सराव केला. कर्णधार रोहित शर्मासह इशान किशन, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि अन्य खेळाडूंनी नेट्समध्ये सराव केला. या मालिकेत रवींद्र जडेजा व बुमराह यांचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.

सरावाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आणि त्यावर त्याची पत्नी रितिका सजदेह हीने त्याला ट्रोल केले. रोहितने इंस्टाग्रामवर त्याचे काही फोटो पोस्ट केले आणि त्यावर असे लिहिले. पण, रितिकाचे त्याच्या खालीच कमेंट केली. तिने लिहिले, हे सर्व शानदार आहे, परंतु कृपया तू मला कॉल बॅक करशील का. भारत-श्रीलंका यांच्यात आतापर्यंत १९ टी-२० सामने झाले आणि त्यापैकी १३ भारताने जिंकले आहेत.

https://www.instagram.com/p/CaR_h2APG0Z/?utm_source=ig_embed&ig_rid=f2705feb-8dd6-4c24-9efa-7a61e6b56701

श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारत ११ पैकी ८ सामने जिंकला आहे. श्रीलंकेचा संघ नुकताच ऑस्ट्रेलियातून पाच सामन्यांची मालिका १-४ अशी गमावून आला आहे. दरम्यान, दीपक चहर व सूर्यकुमार यादव यांनी दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली आहे.

भारताचा टी-२० संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान

सुधारित वेळापत्रक

पहिली टी-२० – २४ फेब्रुवारी, लखनौ

दुसरी टी-२० – २६ फेब्रुवारी, धर्मशाला

तिसरी टी२० – २७ फेब्रुवारी, धर्मशाला

पहिली कसोटी – ४ ते ८ मार्च, मोहाली

दुसरी कसोटी – १२ ते १६ मार्च ( दिवस-रात्र), बंगळुरू


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here