आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

कर्णधार आजच्या सामन्यात या युवा फलंदाजासह उतरणार; पाहा संभाव्य अंतिम अकरा खेळाडूंचा संघ!


भारत विरुद्ध श्रीलंका आज पहिला टी-२०सामना लखनऊ इथे होणार आहे. आज संध्याकाळी ७वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. ६.३० वाजता नाणेफेक होईल. टी-२० च्या पहिल्या सामन्यासाठी नागरिकांना स्टेडियममध्ये परवानगी नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी मात्र ही परवानगी देण्यात आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. संपूर्ण युवा संघ घेऊन कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीला या सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. रिषभ पंत देखील खेळणार नाही. तर सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहर दुखापत झाल्याने संघातून बाहेर झाले आहेत.

विराट कोहली ऐवजी श्रेयस अय्यर मैदानात उतरणार आहे. तर रिषभ पंत ऐवजी संजू सॅमसन यष्टीरक्षकाची धुरा सांभाळेल अशी चर्चा आहे. रविंद्र जडेजा मैदानात खेळताना दिसणार आहे. तर भुवी आणि बुमराह देखील या सामन्यात असतील.

भारतीय संघ संभाव्य अकरा खेळाडू

रोहित शर्मा (कर्णधार) , ईशान किशन, श्रेयस अय्यर, संजू  सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.

व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूरकडे अष्टपैलू म्हणून पाहिलं जाण्याची शक्यता आहे. त्यांना दोन्ही भूमिका चोख पार पाडाव्या लागणार आहेत. युवा संघ असल्याने कर्णधार रोहित शर्मासमोर मोठं आव्हान आणि तेवढेच कठोर निर्णय घेणं अशा दोन गोष्टी समोर असणार आहेत.

टी-२० सामन्यांचं कसं असणार वेळापत्रक

पहिला टी-२० सामना – २४ फेब्रुवारी- लखनऊ (वेळ – संध्याकाळी ७ वाजता)

दुसरा टी-२० सामना – २६ फेब्रुवारी- धर्मशाळा (वेळ – संध्याकाळी ७ वाजता)

तिसरा टी-२० सामना – २७ फेब्रुवारी- धर्मशाळा  (वेळ – संध्याकाळी ७ वाजता)


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here