आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
रोहित शर्मा त्याच्या तालमीत भारतीय संघाचा पुढील कर्णधार तयार करणार असा विश्वास व्यक्त केला
भारताचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्मा आपली पहिली कसोटी मालिका श्रीलंकेविरूद्ध खेळवणार आहे. मात्र निवडसमितीने रोहितची कसोटी कर्णधार म्हणून निवड करतानाच तो त्याच्या तालमीत भारतीय संघाचा पुढचा कर्णधार तयार करेल असे सांगितले होते. याबाबत रोहित शर्माला पत्रकार परिषदेत बोलताना विचारले असता त्याने संघातील तीन खेळाडू आपली जागा घेण्याजोगे आहेत असे सांगितले.
रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला की, ‘संघातील केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्याकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहिले जाते. मला त्यांना प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज लागणार नाही. कारण ते तेवढे परिपक्व झाले आहेत. त्यांना ज्यावेळी कोणताची तरी गरज असेल त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करण्यास मला आनंदच होईल. अशा प्रकारेच आमची बढती झाली आहे. आम्हाला प्रत्येकाला कोणी ना कोणी मार्गदर्शन केले आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक जण यातून गेला आहे.’
तो पुढे म्हणाला, ‘तुम्ही बुमराह, राहुल आणि ऋषभ पंतबाबत बोलत असाल तर त्यांनी भारतीय क्रिकेटच्या यशात मोठी भुमिका आहे. त्यांच्याकडे भविष्यातील नेतृत्वाच्या दृष्टीकोणातूनही पाहिले जाते. त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे याची त्यांना जाणीव आहे. मात्र आम्ही त्यांच्यावर याचे दबाव टाकत नाही. ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. त्यांनी फक्त खेळाचा आनंद घ्यावा आणि त्यांची गुणवत्ता सिद्ध करावी.’
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.