आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

‘ रामा रामा क्या है ड्रामा’ ने वाढवली ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी


पाकिस्तान दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. गेल्या ५ वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या यशात मोलाचे योगदान देणारे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम पाकिस्तानमध्ये जाणार नाहीत.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया सध्या पाकिस्तान दौऱ्यासाठी फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकाच्या शोधात आहे. यामध्ये न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीचे नाव आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरीशी संपर्क साधला आहे. २०१७ मध्ये भारतात येण्यापूर्वीही ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांनी व्हिटोरीशी चर्चा केली होती. व्हिटोरीने २०१९ ते २०२१ पर्यंत बांगलादेशचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले.

श्रीधरन श्रीराम यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंना खूप फायदा झाला आहे. विशेषत: नॅथन लायन, एश्टन एगर आणि अॅडम झॅम्पा यांच्या गोलंदाजीत एक वेगळा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे, पण ते पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलियाला आपली सेवा देऊ शकणार नाहीत.

पाकिस्तान दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ पुढीलप्रमाणे –

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, एश्टन एगर, स्कॉट बोलंड, जोश इंग्लिस, नॅथन लियॉन, उस्मान ख्वाजा, मिचेल मार्श, मिचेल स्वीपसन आणि मायकेल नेसर.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here